‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगावऐवजी गुजरातमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सध्या सत्तेत असणारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार यासाठी जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातोय. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी आधीच्या सरकारला म्हणजेच महाविकास आघाडी सरकारला यासाठी जबाबदार ठरवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मागील दोन वर्षांमध्ये योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कंपनी बाहेर गेली असेल असं मत व्यक्त केलं. तर उदय सामंत यांनीही अशाच पद्धतीचं विधान करत आधीच्या सरकारवर टीका केली. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांचा थेट उल्लेख करत त्यांना या टीकेवरुन खडे बोल सुनावले आहेत.

नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: “महाराष्ट्रातील नेतृत्वासोबत…”; ‘वेदान्त’च्या मालकांची राज्यासाठी मोठी घोषणा; गुजरातला प्राधान्य का? याचंही दिलं उत्तर

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी या महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी झालं ते झालं आता नवीन काय करता येईल असा विचार केला पाहिजे अशी भूमिका मांडली. मात्र त्याचवेळी त्यांनी या प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन त्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला दोष देणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांचा खोचक शब्दांमध्ये समाचार घेतला.

नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्यासंदर्भात CM शिंदे म्हणतात, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर…”

“मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या दोघांचं वक्तव्य असं होतं की मागच्या सरकारच्या काळात या प्रकल्पासंदर्भात निर्णय घेतला नाही. त्यासाठी उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत मंत्री होते. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते. हे दोघे ज्या मंत्रिमंडळात होते, त्या मंत्रीमंडळाने दुर्लक्ष केल्याचे आरोप केले. मला वाटतं हे शहाणपणाचं लक्षण नाही,” असा टोला शरद पवार यांनी लगावला.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना भाजपासंदर्भात सूचक इशारा; म्हणाले, “महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पंतप्रधानांच्या भेटीची चर्चा झाली. ते मदत करतील असं सांगितलं जात आहे. तसं झालं तर आनंदच आहे. पण आणखीन एक प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असं म्हटलं जात आहे. हे म्हणजे एका घरात एका लहान मुलाला एक फुगा दिला, दुसऱ्या मुलाच्या हट्टानंतर त्याला त्याहून मोठा फुगा देऊ असं सांगण्यासारखं आहे,” असंही पवार म्हणाले.