राज्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शिंदे सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ३ हजार ५०१ कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्त केले आहेत.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार, शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा हजार

Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार

जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये, बागायत पिकांसाठी २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर ३६ हजारांची मदत सरकारकडून करण्यात आली आहे. तीन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ही मदत केली जाणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून नागरिकांना हा आर्थिक दिलासा देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांना वाढीव मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Video : “तुमच्यासारखे छक्के-पंजे…”, भाजपाच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार; रऊफ मेमनला नेमकं कोण कोण भेटलं?

अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसला आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील १८ जिल्ह्यांमध्ये पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या भागातील १२ हजार ७८८ हेक्टर शेतजमीन उद्ध्वस्त झाली आहे.