Shivsena MLA Disqualification Verdict : ठाकरे गटाचे १४ आमदार आणि शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र करण्याकरता दोन्ही गटांनी एकमेंकाविरोधात याचिका केली होती. या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल सुनावला. त्यानुसार, दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरले असून शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचं राहुल नार्वेकरांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या १९९९ सालच्या घटनेचा आधार दिला. तर, सुनिल प्रभूंचा व्हीप अवैध असल्याचं सांगून भरत गोगावलेंचा व्हीप राहुल नार्वेकरांनी मान्य केला आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. त्याचा निकाल आल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
“दिल्लीतून जे आदेश मिळाले ते आदेश येथे दिले आहेत. संविधान, कायदा, सत्य काय आहे यावर हे आदेश नाहीत. जमिनीवरचं सत्य या आदेशात नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची शिवेसना ६० वर्षांआधी स्थापना झाली होती. शिवसेनेचे आजचे मालक एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेच्या स्थापनेवेळी किती वय किती होतं? त्यांचा तेव्हा जन्म तरी झाला होता का? बाळासाहेब ठाकरेंची शिवेसना इतिहासजमा झाला. भाजपाचं जुनं स्वप्न होतं की बाळसाहेबांची शिवसेना एकदिवस संपवणार”, अशी टीका संजय राऊतांनी केली.
हेही वाचा >> ठाकरे गटाला पहिला मोठा धक्का, २०१८ सालची घटनादुरुस्ती ठरवली अवैध, राहुल नार्वेकर काय म्हणाले?
“पण बाळासाहेबांची शिवसेना अशा निर्णयांमुळे, अशा कागदपत्रांमुळे संपणार नाही. शिवसेना जतनेते आहे. महाराष्ट्रातील रक्ता-रक्तात आहे. आजचा हा निर्णय कोणताही न्याय नाही. हे एक षडयंत्र आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालायत नक्की जाणार. न्यायालयात आम्ही आमची लढाई सुरूच ठेवणार. राहुल नार्वेकरांना इतिहास लिहायची संधी दिली होती. त्यांनी ती संधी गमावली आहे. या व्यक्तीनेही महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला आहे. संविधानपाठीत बसून त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला. इतिहास त्यांना लक्षात ठेवेल. या निर्णयाविरोधा जे फटाके वाजवत आहेत ते महाराष्ट्राचे गद्दार आणि बेईमान आहे. यांची अवस्था मुसोलिनीसारखी होईल”, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा >> शिंदे गटाचे १६ आमदार पात्र, नार्वेकरांचा निकाल येताच आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “देशासाठी हे मोठे संकेत…”
“ही मॅचफिक्सिंग आहे. याशिवाय दुसरं काही नाही. प्रभू श्रीरामाचं नाव घेण्याचा अधिकार यांना नाही. प्रभू श्रीराम आपल्या वडिलांसाठी वनवासात गेले होते. पण इथे बाळासाहेब ठाकरेंना वनवासात पाठवलं आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेबांची शिवसेना चोरमंडळाच्या हातात देण्याचा अधिकार कोणी दिला?
“भरत गोगावले यांचा व्हीप विधासनभा अध्यक्षांनी मान्य केला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्षांना काय अधिकार आहे निर्णय घेण्याचा? ६० वर्षांपूर्वी ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली त्या पक्षाची मालकी भाजपाने नेमलेली व्यक्ती ठरवणार का? ज्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक दिल्ली करते. दिल्लीच्या मेहबरबानीवर दिल्लीत बसतात. दिल्लीचे आदेश पाळतात, ते शिवसेनेचे भविष्य काय ठरवणार? बाळासाहेबांची शिवेसना चोरमंडळाच्या हातात देण्याचा अधिकार कोणी दिला?” असा सवालही त्यांनी विचारला.
हेही वाचा >> एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय, उद्धव ठाकरेंसमोर नवा पेच
दीड शहाणं कोण?
“जनता ठरवेल आता काय ते. जे आज फटाके वाजवत आहेत, त्यांच्या म्होरक्यांची अवस्था इटलीच्या मुसोलिनीसारखी होईल. लोक त्यांना सोडणार नाहीत. बाळासाहेबांच्या शिवसेनेची अशी अवस्था करणे हा महाराष्ट्राच्या पाठित खंबीर खुपसण्याचा प्रयत्न आहे. पण शिवेसनेना यातून उभी राहतेय. निवडणुका घ्या आणि कोणती खरी शिवसेना हे ठरवा. निवडणूक आयोग हे चोरांचे सरदार आहे. सर्वोच्च न्यायालायने दिलेला निर्णय काय आहे, भरत गोगावले बेकायदा व्हीप आहे. सुनील प्रभू हे खरे व्हीप आहेत. राष्ट्रपतींना बहुमत ठरवण्याचा अधिकार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. या देशात सर्वोच्च न्यायालयात शहाणे की हे आता दीडशहाणे शहाणे? असंही संजय राऊत म्हणाले.