दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं. या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले होते. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. मात्र, आता या प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सीबीआयच्या या अहवालानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी सीबीआयच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दिशाच्या मृत्यूच्या वेळी दोन मंत्र्यांच्या गाड्या तिथे गेल्याचं वृत्त होतं, त्याबाबत काहीही चौकशी झाली नाही, असं पावसकर यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar On PM Narendra Modi
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका; म्हणाले, “रशियाचे पुतिन आणि मोदी…”
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना किरण पावसकर म्हणाले, “दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी एक नव्हे तर दोन मंत्र्यांची चौकशी करा, अशी मागणी सर्वांनीच केली होती. पण त्याबाबत दुर्दैवाने कोणतीही चौकशी झाल्याचं वृत्त कुठही बघायला मिळालं नाही. पण आज त्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे सर्वांच्या मनात आजही असा संभ्रम असेल की त्या दोन घटनांमध्ये काय संबंध आहे.”

हेही वाचा- आत्महत्या, बलात्कार आणि खुनाचे गंभीर आरोप, आता सीबीआयने सांगितलं दिशा सालियनच्या मृत्यूचं नेमकं कारण

सुशांत सिंह राजपूत हा एक प्रसिद्ध अभिनेता होता आणि दिशा सालियन ही त्याची मॅनेजर होती. त्या पार्टीच्या दिवशी दोन मंत्र्यांच्या गाड्या तिथे गेल्या होत्या, हे खरं आहे का? या दोघांच्या मृत्यूचा एकमेकांशी काही संबंध आहे का? असा प्रश्न पडतो. आता एका प्रकरणाविषयी सीबीआयने सांगितलं की, तिची हत्या झाली नव्हती, तर तो अपघात होता. मग दुसऱ्या मृत्यूबाबत काय गूढ आहे? असा प्रश्न पावसकरांनी विचारला आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण नेमकं काय?

२०२० मध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं म्हटलं गेलं. नंतर पुढे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप झाला.

नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर दिशा सालियानच्या आई-वडिलांनी राणेंविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणेंना समन्सही बजावलं होतं.