राज्यतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदे गटालाही समाधानकारक कामगिरी करता आली आहे. पण ठाकरे गटाला काही प्रमाणात फटका बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा पक्ष सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला संपवत आहे. उद्धव ठाकरेंचे डोळे अजूनही उघडत नाहीये. आपला पक्षे कुठे चालला आहे, याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष द्यावं, अशी टीका संतोष बांगर यांनी केली.

हेही वाचा- “कोर्टाचा निर्णय आला तर पुढच्या निवडणुकीत संजय राऊत…”, ‘त्या’ विधानावर रावसाहेब दानवेंचं उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रामपंचायत निवडणूक निकालावर भाष्य करताना संतोष बांगर म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यात एकूण ६१ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ७० टक्के जागा शिवसेनेच्या (शिंदे गट) ताब्यात आल्या आहेत. त्यातील एक जागा ठाकरे गटाला मिळाली आहे. त्यामुळे ठाकरे गटात आजही जे उर्वरित आमदार राहिले आहेत, त्यांना किमान आता तरी परिस्थिती काय आहे? हे कळून चुकायला हवं. उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष सहाव्या क्रमांकावर पक्ष नेवून ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची लोक यांना साफ करत आहेत. पण यांचे अजूनही डोळे उघडत नाहीयेत. त्यामुळे सन्मानीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पुन्हा सांगायचंय की, साहेब तुम्ही कुठे चालला आहात, याचा विचार करा.