राहाता: शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज, मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून दिलेल्या आश्वासनांनंतरही प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीतून डावलण्यात आल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील काकडी गावच्या शिवारात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले आहे. विमानतळासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून अनेकवेळा आश्वासने देण्यात आली, परंतु या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. शिर्डी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दिल्ली व कोलकाता येथे प्रशिक्षणासाठी नेण्यात आले होते. प्रशिक्षणानंतर नोकरी देण्याचे लेखी आश्वासन विमानतळ प्रशासनाने दिले होते. मात्र प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करूनही त्या तरुणांना नोकरी न देता ‘थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट’ काढण्यात आल्याची तक्रार आहे.

विमानतळ विकास कंपनीने करारावर नोकरी द्यावी. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या शिफारशीने एव्हिशन अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थींना कोणत्याही ठेकेदारामार्फत नव्हे, तर थेट विमानतळ विकास प्राधिकरणाच्या करारावर नोकरीत घेण्यात यावे. शिर्डी विमानतळामार्फत प्रकल्पग्रस्त मुलांनी दिल्ली आणि कोलकाता येथे ‘एव्हिशन फायर ट्रेनिंग’ केले असताना देखील त्यांना शिर्डी विमानतळातील नोकरीपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आदी मागण्या असल्याचे उपोषणकर्ते कानिफ गुंजाळ यांनी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील काकडी गावच्या शिवारात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले आहे. विमानतळासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून अनेकवेळा आश्वासने देण्यात आली, परंतु या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. शिर्डी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दिल्ली व कोलकाता येथे प्रशिक्षणासाठी नेण्यात आले होते. प्रशिक्षणानंतर नोकरी देण्याचे लेखी आश्वासन विमानतळ प्रशासनाने दिले होते. मात्र प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करूनही त्या तरुणांना नोकरी न देता ‘थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट’ काढण्यात आल्याची तक्रार आहे. विमानतळ विकास कंपनीने करारावर नोकरी द्यावी. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या शिफारशीने एव्हिशन अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थींना कोणत्याही ठेकेदारामार्फत नव्हे, तर थेट विमानतळ विकास प्राधिकरणाच्या करारावर नोकरीत घेण्यात यावे.

या सर्व मागण्यांसाठी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज, मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून दिलेल्या आश्वासनांनंतरही प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीतून डावलण्यात आल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.