वैद्यकीय पूर्वपरीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्न संचालित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शिरीष बाळासाहेब देशमुख २००पकी १९६ गुण घेऊन राज्यात तिसरा, तर मराठवाडय़ात पहिला आला.
त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे १२६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पकी १५५पेक्षा अधिक गुण घेतलेले २३ विद्यार्थी आहेत. वरद वजरकर (१९१ गुण), श्रीनाथ श्रीफुले (१८१), अर्चना नवघरे (१७८), स्नेहा वट्टमवार (१७४), गजेंद्र लोंढे (१७२), तृप्ती िशदे (१७२), दिनेश चव्हाण, मयुर चोपडे, किशोर वीर, माधवी सामृतवार (१५५), अभिजित कसंबे, सपना परटकर, स्वप्नील वाघमारे, प्रिया फासे (१७१), जयेंद्र जगताप (१७०), प्राजक्ता सोनवणे (१६९), राजश्री बारटक्के (१६८), सरस्वती धिक्कार, अंजली काकडे, प्रियंका िपपळकर, किशोर वीर, मयुर चोपडे, शीतल िशदे, योगेश राणे या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. रिलायन्स लातूर पॅटर्नने बारावी बोर्डाच्या परीक्षेतही आपला दबदबा कायम ठेवला. महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांना ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळाले. जेईई परीक्षेत १०५ अधिक गुण घेणारे ३० विद्यार्थी आहेत. उमाकांत होनराव, प्राचार्या सुलक्षणा केवलराम, उपप्राचार्य सतीश मारकोळे, आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
‘शाहू’च्या १०० विद्यार्थ्यांची भरारी
सीईटी परीक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालयाने आपली गुणवत्तेची छाप याही वर्षी कायम राखली. निशा पत्तेवार, विनय भांगडिया व मयुर डक यांनी १९४ गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला. १९० पेक्षा अधिक गुण घेणारे १२ विद्यार्थी, १८० पेक्षा अधिक गुण घेणारे १०१, १७० पेक्षा अधिक गुण घेणारे २८८ विद्यार्थी, तर १५०पेक्षा अधिक गुण घेणारे तब्बल ६३३ विद्यार्थी आहेत. एमएससीईटी परीक्षेसोबत महात्मा गांधी मिशनतर्फे (सेवाग्राम) घेतलेल्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतही महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. राहुल चांडोळकर, आकांक्षा गिरी, स्वराली वरकुटे व अल्फ्रेड डिसुझा या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव अॅड. नारायणराव पाटील, सहसचिव प्राचार्य अनिरुध्द जाधव व अॅड. शहाजीराव मनाळे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
‘दयानंद’मध्ये ऋषिकेश पहिला
दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश हिरोळीकर (१८९ गुण) महाविद्यालयात पहिला आला. भूषण जाधव (१८८ गुण), सागर राख (१४३ गुण) एनटी ३ प्रवर्गात महाविद्यालयात पहिला आला. विश्वजित मंदे (१५७) एसटी प्रवर्गात पहिला आला. भटके विमुक्त प्रवर्गातून अभिजित राठोड (१७०) पहिला आला. सहा विद्यार्थ्यांना १८०पेक्षा अधिक, तर २८ विद्यार्थ्यांना १७० पेक्षा अधिक गुण मिळाले. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरिवद सोनवणे, सचिव रमेश बियाणी आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2015 रोजी प्रकाशित
शिरीष देशमुख मराठवाडय़ात पहिला
वैद्यकीय पूर्वपरीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्न संचालित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शिरीष बाळासाहेब देशमुख २००पकी १९६ गुण घेऊन राज्यात तिसरा, तर मराठवाडय़ात पहिला आला.
First published on: 07-06-2015 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shirish deshmukh first in marathwada