मागील अनेक दिवसांपासून मनसेचे प्रमुख राज ठाकरे चर्चेत आहेत. राज ठाकरेंच्या संभांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. या सभांमध्ये राज ठाकरे राज्य सरकार तसेच सरकारमधील तिन्ही पक्षांवर कठोर टीका करताना दिसत आहे. हिंदुत्वाला जवळ करत राज ठाकरे राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. त्यांनी या मुन्नाभाईच्या डोक्यात केमिकल लोचा आहे, असे म्हणत राज ठाकरेंना कोपरखळी मारली आहे.

हेही वाचा >> शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला अटक, पोलीस स्थानकाबाहेर फेकली काळी शाई!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(शनिवार) सायंकाळी एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभेत बोलत होते. यावेळी बोलताना “मला एका शिवसैनिकाने चांगले सागितले. तो म्हणाला साहेब तुम्ही मुन्नाभाई चित्रपट पाहिलात का? त्या चित्रपटात संजय दत्तला गांधीजी दिसतात. गांधीजी बोलतात. मग हा गांधीगीरी करायला लागतो. आपल्याकडेही तशीच एक केस आहे. मी विचारलं की कोणती रे? तो म्हणाला अहो ती नाही का ज्याला स्वत:ला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. शाल घालून फिरतात हल्ली. कधी मराठीच्या नादाला लागतात. कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. मग मी म्हटलं अरे चित्रपटातील मुन्नाभाई लोकांचं भलंतरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई आहे. ही केमिकल लोचाची केस आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणले.

हेही वाचा >> “या अशा चार-दोन विकृत टाळक्यांमुळे…”, राज ठाकरेंनी शरद पवारांविषयीच्या ‘त्या’ पोस्टवरून केतकी चितळेला सुनावलं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच पुढे बोलताना राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या उद्देशून आता किती मुन्नाभाईंना फिरायचं आहे ते फिरुद्या. कोणाला अयोध्येला जायचं आहे तर जाऊद्या, असे उद्दव ठाकरे म्हणाले. तसेच आदित्य ठाकरे परत अयोध्येला जात आहेत. अगोदर ते तिरुपतीला गेला होता, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची आठवण करुन दिली.