भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर निशाणा साधल्याचे दिसून आले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अन्य कुणाकडे सोपवण्याची ही वेळ असल्याचही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “भारतीय संस्कृतीमध्ये एकमेकांच्या तब्येतीवर टीका टिप्पणी करणं नाही, कारण तो विषय त्या माणसाच्या हातामध्ये नसतो. किंबहुना शत्रू जरी असेल, उद्धव ठाकरे तर आमचे मित्र आहेत. पण शत्रू जरी असला तरी त्याच्या तब्यतीबद्दल आपण त्याला शुभेच्छा देतो. त्यामुळे तो विषय नाही, विषय वारंवार असा चाललेला आहे की, जर अशी तब्यतीची स्थिती असेल तर त्यांनी कोणाला तरी चार्ज दिला पाहिजे. याच कारण खूप विषय महाराष्ट्रासारख्या १२ कोटी जनता असणाऱ्या राज्याचे असतात. कालची बैठक ही अत्यंत महत्वपूर्ण होती, तुम्ही टोपेंना पाठवलं, दिलीप वळसेंना पाठवलं. देशाच्या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री असताना, आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना बोलायला वाव मिळणार नाहीच. पण तेच जर तुम्ही असता तर तुम्ही केवळ मुख्यमंत्री नाहीत, तर तुमचे खूप जवळचे संबंध देखील आहेत. त्यामुळे चारवेळा बैठकीत मोदी विचारत असतात, उद्धव ठाकरे तुमचं काय मत आहे. पण तुम्ही तब्येतीमुळे नाही जाऊ शकलात आणि तब्येतीची हेळसांड देखील करू नये. परंतु, राज्याच्या हितासाठी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. पंतप्रधान मोदींचं देखील हेच म्हणणं आहे की पोटावर पाय आणून निर्बंध लादू नका. महत्वपूर्ण निर्णय करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत. घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करतो वैगरे हे पुरत नाही. मग सगळ्या मुख्यमंत्र्यांनी तसच केलं असतं. मुख्यमंत्री म्हणजे उठणे, जाणे, भेटणे, चर्चा करणे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे असं आहे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे. ”

तसेच, “मी तुमच्या तब्यतीबाबत परमेश्वराकडे प्रार्थना करतो की लवकर हे बरे व्हावेत. परंतु तोपर्यंत कोणीतरी तुमच्यावतीने मुख्यमंत्री म्हणून… कारण मुख्यमंत्री या शब्दात अर्थ आहे. मुख्यमंत्री या शब्दात ताकद आहे, त्यामुळे तो लागेल आणि तो कोण असेल ते तुम्हीच ठरवायचं आहे.” असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “काल मुंबै बँकेची निवडणूक झाली, महाविकासआघाडीने चेअरमनशिप एकत्र लढवायची ठरवली. खरं म्हणजे, बँकांमध्ये पक्ष नसतात. मुंबै बँकेत देखील सगळ्यांनी मिळून बिनविरोध केली आणि मग दबावाने त्यामधील जे कलरवाले आहेत, यांनी वेगळा चेअरमन उभा केला. चला राष्ट्रवादीने चेअरनमन पदरात पाडून घेतला, शिवसेनेचा व्हाईस चेअरमन पडला? हे कसं झालं? आता हे शिवसेनेला हे कळत नाही की तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे आणि त्यामध्ये तुम्ही फसत चालला आहात. आता तुम्ही गोवा, उत्तर प्रदेशमध्ये शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन चालले आहेत. त्यांना असं तोंड फोडून घेण्याची सवयच आहे, गेले डिपॉझिट जप्त झालं. त्यांची त्या निमित्त वेगवेगळ्या राज्यात मत वाढतात, एक अखिल भारतीय पक्ष व्हायला एक किमान मतदरांची संख्या लागते, तुम्ही का सगळ्या ठिकाणी तुमचंही तोंड फोडून घेताय? हा प्रश्न आहे. तोंड फोडून घेणे म्हणजे पराभव, पडणे, डिपॉझिट जप्त होणे..” असंही यावेळी शिवसेनेला उद्देशून चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena does not know that there is a plan to eliminate them completely chandrakant patil msr
First published on: 14-01-2022 at 11:45 IST