अलिबाग – मुरूड तालुक्यातील मिठेखार गावात दरडग्रस्त कुटुंबाचे सांत्वन करायला गेलेल्या शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महिला कार्यकर्त्या एकमेकांना भिडल्या. वादाची ठिणगी पडली आणि महिलांचे दोन गट एकमेकांना भिडले. यामुळे दुःखद प्रसंगात राजकारणी महिलांचा तमाशा पाहून ग्रामस्थ संतापले आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.
मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात मंगळवारी सकाळी दरड कोसळून विठा मोतीराम गायकर (७५) यांचा जागीच मृत्यू झाला. वातावरण शोकाकुल, आक्रोश आणि हळहळ यामध्ये ग्रामस्थ दगडखचांतून आपले भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करत असताना घटनास्थळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेकापच्या महाराष्ट्र प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आपल्या सहकारयांसह तेथे दरडग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पोहोचल्या.
तेथे झालेल्या गर्दीत चर्चा सुरू असतानाच विषय भरकटला. चित्रलेखा पाटील यांनी नादुरूस्त रस्त्यांचा विषय काढत हे खोकेवाले काही करणार नाहीत असे म्हणताच मानसी दळवी यांनी त्यांना जाब विचारला आणि दोन्ही गटात वाद सुरू झाला. बघता बघता प्रकरण हातघाईवर आले आणि हातातोंडाशी गाठ पडली.
अलिबाग – मुरूड तालुक्यातील मिठेखार गावात दरडग्रस्त कुटुंबाचे सांत्वन करायला गेलेल्या शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महिला कार्यकर्त्या एकमेकांना भिडल्या. वादाची ठिणगी पडली आणि महिलांचे दोन गट एकमेकांना भिडले. यामुळे दुःखद प्रसंगात राजकारणी महिलांचा तमाशा पाहून ग्रामस्… pic.twitter.com/J2VqVLDXM1
— LoksattaLive (@LoksattaLive) August 20, 2025
जेथे सांत्वन करायचे बाजूलाच राहिले आणि दुःखाच्या ठिकाणी तमाशा झाला. इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकारयांनी यात वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण थोडक्यावर निभावले. घडल्या प्रकारावर ग्रामस्थांनी देखील संताप व्यक्त केला. या घटनेचे व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत होते. त्यांची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होती.