scorecardresearch

“पाच वर्षाचं अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न, सातारकरांनी मनोरंजन म्हणून पाहावे”; शिवेंद्रराजेंचा टोला

ज्यावेळी निवडणूका येतील त्यावेळी असे अनेक डायलॉग सातारकरांना बघायला मिळणारा आहे, असे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले

Shivendra Raje criticism on the video on Udayan Raje movie Pushpa look

दाक्षिणात्य स्टार अल्लू अर्जुन याचा ‘पुष्पा: द राईज’  सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. याच सिनेमाच्या प्रेमात आता साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले सुद्धा पडले आहेत. रविवारी उदयनराजे चक्क लुंगी घालून आले होते. तर ‘सामी सामी’ गाण्यावर कॉलर सुद्धा उडवली. आपल्या डायलॉगाबाजी तसंच स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असणारे उदयनराजे रविवारी साताऱ्यात पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर चक्क ‘लुंगी’ नेसून पोहोचले होते. यावेळी त्यांनी फोटो काढण्याचा आनंद लुटला. यावरुन आता आमदार शिवेंद्रराजेंनी टीका केली आहे.

“नगरपालिकेच्या विषयांवरुन लोकांचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. कुठे लुंगी घालून फिर तर कुठे गाणी लावून फिर हे बाकी काही नाही तर पाच वर्षातील अपयश लपवण्याचे काम ते लुंगीमधून करत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. सातारकरांनी मनोरंजन म्हणून त्याकडे पाहावे आणि विषय सोडून द्यावा. ज्यावेळी निवडणूका येतील त्यावेळी असे अनेक डायलॉग सातारकरांना बघायला मिळणारा आहे,” अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.

उदयनराजेंनाही ‘पुष्पा’ चित्रपटाची भुरळ, लुंगी नेसून पोहोचले सेल्फी पॉईंटवर; कार्यकर्त्यांना फ्लाइंग किस देत उडवली कॉलर

प्रसारमाध्यमांनी उदयनराजेंना लुंगी नेसण्याचं विशेष कारण विचारलं असता, मोकळं वाटतंय, छान वाटतंय असं उत्तर दिलं. उदयनराजेंसोबत त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीही लुंगी नेसली होती. सेल्फी काढल्यानंतर उदयनराजे आपल्या कारमध्ये जाऊन बसले तेव्हा गाडीत ‘पुष्पा’ चित्रपटातील गाणं सुरू होतं. या गाण्यावरही उदयनराजे फिदा असल्याचं दिसत होतं. मग काय नेहमीप्रमाणे आपल्या स्टाइलमध्ये फ्लाईंग किस देत उदयनराजेंनी कॉलर उडवली.

दरम्यान, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना  यांच्या मुख्य भूमिका असलेला सुकुमार दिग्दर्शित पुष्पा: द राईज हा सध्या भारतातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. हा सिनेमा तेलगू, तामिळ, मल्याळम, हिंदीत प्रदर्शित झाला. या सर्वच भाषेत चित्रपटाची गाणी डब करण्यात आलीत. या सिनेमाने तरुणाईला वेड लावले आहेच पण अनेक रेकॉर्ड सुद्धा पुष्पाने केले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivendra raje criticism on the video on udayan raje movie pushpa look abn

ताज्या बातम्या