सातारा : सातारा जिल्ह्यात ब्रिटिशकालीन पुलांची संख्या मोठी आहे. या पुलांना शंभरहून अधिक वर्षे झाली असून, त्यावरील वाहतूक आजही सुरू आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेचा ठरतो. काही दिवसांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून जीवितहानीनंतर झालेल्या राज्य शासनानेदेखील जुने पूल, साकव इमारतींचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. मुंबई येथे मंत्रालयात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे यांनीही जुने पूल व इमारतीवरून अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सूचना केल्या.
इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर राज्यासह सातारा जिल्ह्यातील जुन्या पुलांचा विषय चर्चेस आला आहे. राज्य शासनानेदेखील हा विषय आता गांभीर्याने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीदेखील मुंबईत झालेल्या बैठकीत २५ वर्षे जुने पूल, साकव व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल शासनास तातडीने सादर करावा, अशा सूचना बांधकाम विभागास दिल्या.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे यांनीही जुने पूल व इमारतींवरून अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सूचना केल्या. जे पूल, साकव २५ हून अधिक वर्षे जुने आहेत त्यांचे व शासकीय इमारतींचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करावे, त्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने शासनास सादर करावा, जिथे कुठे धोकादायक परिस्थिती असेल तिथे तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सक्त सूचना त्यांनी केल्या. शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील जुन्या व धोकादायक पुलांचा प्रश्नही आता मार्गी लागणार आहे.
वारकऱ्यांचा मार्ग होणार सुकर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला असून, वारीमार्गावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करावेत, वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, ज्यामुळे वारकऱ्यांचा मार्गही आता सुकर होणार आहे.शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री