निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. दारुची दुकाने उघडी ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते बेशरम, नालायक आहेत अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. जसे प्रभू रामचंद्र विवेक हरवून सोन्याच्या हरणाच्या मागे गेले आणि सीतेचे अपहरण झाले तसे राज्यकर्त्यांचा विवेक हरवला आहे असंही यावेळी ते म्हणाले. शिवाजी-संभाजी महाराजांची अंतकरणात वस्ती असती तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते झाले असते असंही त्यांनी सांगितलं. दसऱ्यानिमित्त साध्या पद्धतीने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश आहे. मग आपल्या देशाचा पहिला क्रमांक कधी येणार? पण आपण तो मिळवला आहे. आपला कट्टर शत्रू असणारा चीन लोकसंख्येत पुढे आहे, त्यामुळे ते आपल्याला जमलं नाही. पण निर्लज्जपणात आपल पहिल्या क्रमांकावर आहोत,” असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivpratishtan sambhaji bhide controversial statement maharashtra central government sgy
First published on: 15-10-2021 at 10:50 IST