शिवसेना नेते एकनाथ शिंदेंमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह संपर्काबाहेर असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे १५ ते ३५ आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून दिपाली सय्यद यांनीदेखील ट्वीट केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं असून असून शिवसेनेचा वाघ झेपणार नाही अशा शब्दांत सुनावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Eknath Shinde Live Updates : “शिवसेनेची तीन नाही, तर १२ मतं फुटली”, भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा दावा; वाचा प्रत्येक अपडेट…

“माननीय एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे. उगाच भाजपाच्या आयटी सेलच्या लिंबू टिंबूंनी सोशल मीडियावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही,” असं दिपाली सय्यद यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंसोबत राज्यातील कोण आमदार आहेत? ही घ्या संपूर्ण यादी

गुजरातमध्ये एकनाथ शिंदे थांबलेल्या हॉटेलबाहेर कडेकोट सुरक्षा; प्रत्येक वाहनाची तपासणी; भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “सर्व आमदार…”

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला असताना एकनाथ शिंदे अचानक बेपत्ता झाले असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवारी विजयी झाले असताना शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटली आहेत. त्यातच एकनाथ शिंदेशी संपर्क होत नसल्याने त्यांनी बंड पुकारल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

एकनाथ शिंदे गुजरातमध्ये सूरतमधील एका हॉटेलात आमदारांसोबत आहेत. सूरतमधील या हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतर कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आहे. पोलीस हॉटेलमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.

सूत्रांनुसार, एकनाथ शिंदे आणि इतर आमदार गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील नेत्यांच्या संपर्कात आहेत. गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर काही आमदारांनी पाटील यांची भेट घेतल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान पाटील यांनी यावर कोणतंही भाष्य करणं टाळलं असून ‘मी गांधीनगरमध्ये असून काही आमदार सूरतमध्ये आल्याची माहिती मिळाली,’ असल्याचं म्हटलं आहे.

मतं फुटली…

शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १३ आमदारांसहीत विधान परिषदेच्या निकालानंतरपासून संपर्कात नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला राज्यसभेपेक्षाही दहा मतं अधिक मिळाल्याचं उघड झालं असून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची अनेक मतं फुटल्याचं यावरुन स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे कालच्या निवडणुकीदरम्यान सचिन आहिर वगळता कोणीही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली नाही. आमश्या पाडवी आणि आहिर वगळता कोणताही नेता प्रसारमाध्यमांसमोर आला नाही. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि आमदार पक्षाच्या संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढलीय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena deepali sayed tweet ekanth shinde bjp sgy
First published on: 21-06-2022 at 13:25 IST