अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे, असे या अग्रलेखात ठाकरे गटाने म्हटले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सडकून टीका केली आहे. “महाराष्ट्राची परंपरा राज ठाकरेंच्या पत्रामुळे राखली गेली. त्यामुळे त्यांच्या मशालीचा चटका त्यांनाच बसला आहे”, असे प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी दिले आहे. “उद्धव ठाकरे कोत्या मनाचे आहेत. राज ठाकरेंचे आभार मानावेत एवढाही मोठेपणा त्यांच्यात नाही”, अशी टीकादेखील त्यांनी केली आहे.

‘मशालीचा चटका बसला’ म्हणणाऱ्या ठाकरे गटाला आशिष शेलारांचे प्रत्त्युत्तर; म्हणाले, “अजरामर असलेला गणपत वाणी…”

या उलट राज ठाकरे केवळ नावानेच नाही तर मनानेही राजे आहेत, असे देशपांडे यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत सहानभूती मिळेल, असं शिवसेनेला वाटत होतं. ते न झाल्यामुळे त्यांनाच चटका बसला आहे, असे देशपांडे म्हणाले आहेत. मशालीचा कोणाला चटका बसला आणि कसला वचपा निघाला? असा सवालही त्यांनी विचारला आहे. राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेच्या पत्रानंतर उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद झाल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला आहे.

“मशालीचा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला”, शिवसेनेचा भाजपा-शिंदे गटावर आसुड; म्हणाले, “अजून बरेच पोळायचे अन्…”

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले खासदार संजय राऊत यांच्यावरही शाब्दिक हल्ला चढवला आहे. संजय राऊतांना जेलमधून बोलण्याचा अधिकार आहे का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. “आम्हीही आंदोलनादरम्यान तुरुंगात होतो, तेव्हा आम्हाला पत्रकारांशी बोलू दिलं जायचं नाही. मग यांना कसं बोलू दिलं जातं? अशी विचारणा करतानाच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. “तुरुंगात असल्याने बाहेर सकाळ झाली की रात्र हे राऊत साहेबांना कळत नसेल, तेव्हा बाहेरच्या स्क्रीप्ट कुठून कळायला लागल्या?” असा टोलाही देशपांडे यांनी लगावला आहे.

“शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा डाव,” रोहित पवारांचा मोठा दावा, म्हणाले “पवार कुटुंबात मतभेद…”

‘सामना’त नेमकं काय म्हटलं आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे”, असा इशारा ‘सामना’तून देण्यात आला आहे. “शिवसेनेच्या विजयी मशालीने या पोटनिवडणुकीतील संकटे व अमंगलाचा नाश केला. भाजपा… कारस्थानी आनंदीबाई… माफ करा, कमळाबाईंनी बेईमान ‘मिंधे’ गटास हाताशी पकडून जो घाव शिवसेनेवर, पर्यायाने महाराष्ट्रावर घातला, त्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नियतीनेच जणू अंधेरी पोटनिवडणुकीचे प्रयोजन केले होते. आधी ऐटीत बेटकुळ्या फुगवून शड्डू ठोकणाऱ्यांना कुस्तीआधीच मशालीची धग आणि चटके बसले व त्यांनी कुस्ती न खेळताच मैदान सोडले,” अशा शब्दांत भाजपावर शिवसेनेने टीकेचे ‘बाण’ सोडले आहेत.