भारतीय जनता पार्टीचे नेते आणि खासदार प्रकाश जावडेकर यांनी पनवेल येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी मोदींचे फोटो वापरून निवडून आले. आता त्यांनी मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली. ही महाराष्ट्राच्या मतदारांशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका जावडेकर यांनी केली.

प्रकाश जावडेकर आज मावळ लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना मावळ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. भविष्यात मावळ लोकसभा मतदार संघात भाजपाचा खासदार असेल, असेही जावडेकर म्हणाले. तसेच आगामी निवडणुकीत आम्ही राज्यातील ४८ पैकी ४८ जागा जिंकणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यसभा जिंकली आता विधान परिषदेत पण गुप्त मतदान आहे. त्यामुळे सर्व जागा जिंकणार असल्याचा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- ‘अग्निपथ योजनेतून तरुणांची टिंगलटवाळी’, छगन भुजबळांची केंद्र सरकारवर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना जावडेकर म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे. कारण हे सरकार काहीच करत नाही. दुसरा पावसाळा आला तरी पहिल्या पुराचे पैसे मिळाले नाहीत. यांचा एकच किमान समान कार्यक्रम आहे, तो म्हणजे लूट लूट लुटायचं. महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराची सर्व विक्रम मोडीत काढली, असंही जावडेकर यावेळी म्हणाले.