केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथे असलेल्या अधीश बंगल्यातील बांधकाम उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवलं आहे. याप्रकरणी न्यायालयाने राणे यांना १० लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. तसेच, हे बेकायदा बांधकाम दोन आठवड्यांत पाडण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे. त्यावरून माजी महापौर, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.

“नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, लढाऊ बाणा त्यांच्यात आहे. त्यांच्या कृतीत एक समंजस्यपणा दिसत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय नारायण राणे खिलाडी वृत्तीने स्वीकारतीत. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर महापालिका कारवाई करते. पालिकेत प्रशासकीय यंत्रणा असल्याने कोण दबाव टाकतील वाटत नाही,” असेही किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

“मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता…”

दसरा मेळाव्यासाठी केलेल्या अर्जावर महापालिकेने निर्णय घेतला नाही. शिवसेनेची पुढील भूमिका काय असेल, या प्रश्नावर पेडणेकर यांनी म्हटलं की, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेची भूमिका ठरवतात. दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. पण, परवानगी मिळेल याची खात्री आहे. परवानगी नाकारण्यासाठी त्यांना कारणे द्यावी लागतील. कोंडी करून परवानगी नाकारली तर मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता हे पाहत आहे,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.