शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येते आहे.  संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आहेत. त्यामुळे अँजिओग्राफी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात येते आहे. आज दुपारच्या सुमारासच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होतं मात्र संजय राऊत यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आज त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर शिवसेना खासदार यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळले. दुपारनंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. गेल्या १५ ते १८ दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. तसंच शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.

संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपावर निशाणा साधला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून ते दररोज पत्रकार परिषद घेत होते. तसेच पक्षाची भूमिकाही घडणाऱ्या घडामोडींनंतर माध्यमांसमोर मांडत होते. या सगळ्या कामाचा ताण संजय राऊत यांना आला आहे. त्याचमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांच्या जागी शिवसेनेचे इतर तीन नेते शरद पवारांशी, काँग्रेसशी चर्चा करतील. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील संजय राऊत यांना भेटायला जाण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेनेने सत्तेसाठीची जो दावा केला होता त्याची मुदत आता संपली आहे. त्यामुळे राज्यातला सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशात आता संजय राऊत यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

 

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp sanjay raut angioplasty in lilawati hospital scj
First published on: 11-11-2019 at 21:05 IST