एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते भाजपा आणि शिवसेनेत जोरदार प्रवेश करत असतानाच शिवसेनेच्या पालघरमधील आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये अनेक नाराज शिवसैनिकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर नाराज भाजपा-शिवसेना नेत्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे.
पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी माजी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, मुख्य प्रवक्ते @nawabmalikncp तसेच @NCPspeaks च्या इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश केला.#राष्ट्रवादीपुन्हा #AssemblyElections2019 #Maharashtra pic.twitter.com/wvMg2SRVUo
— NCP (@NCPspeaks) October 3, 2019
पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या उपस्थितीत गुरूवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला.