शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी एकेरी उल्लेख करत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांच्या तोडफोडीवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “गुणरत्न सदावर्तेंना गाडी फोडण्याची शिक्षा कमी झाली. त्यांना संपवायला हवं होतं”, असं मत संजय गायकवाडांनी व्यक्त केलं. ते गुरुवारी (२६ ऑक्टोबर) मराठा तरुणांनी सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटनेवर माध्यमांशी बोलत होते.

संजय गायकवाड म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब मराठ्यांच्या तोंडातील आरक्षण हिसकवालं गेलं. त्यांनी न्यायालयात प्रखरपणे मराठा आरक्षणाविरोधात बाजू मांडली. यावेळी ते सुडाने पेटले होते, जसंकाय मराठा आरक्षणामुळे यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे सदावर्तेंना गाडी फोडण्याची शिक्षा कमी आहे, त्यांना संपवायला हवं होतं.”

“गाड्या फोडल्या त्यांना मी हेच सांगेन की, हे कमी झालं”

“गुणरत्न सदावर्ते संपले असते, तर मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. ज्यांनी त्यांच्या गाड्या फोडल्या त्यांना मी हेच सांगेन की, हे कमी झालं. सदावर्तेंची चांगली व्यवस्था करायला हवी होती,” असं मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, कारण…”; गुणरत्न सदावर्तेंची आक्रमक मागणी, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जरांगेंनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केलं आहे”

“मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे की, ते शांततेने आंदोलन करणार आहे. त्यांनी त्यांचं आंदोलन सुरू केलं आहे. गावागावात काही उत्साही कार्यकर्ते असतात. अशा उत्साही कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं आहे. मात्र, अशी भूमिका कुणीही घेऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यात लाखो लोकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की, मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत,” असंही गायकवाडांनी नमूद केलं.