scorecardresearch

“…म्हणून आयफोनचा वापर करा”; शिवसेनेच्या नेत्याची पदाधिकाऱ्यांना सूचना

“सरकारचं जाणीपूर्वक सर्व हालचालींवर…”

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. पण, सत्ता स्थापन केल्यावर शिवसेनेतील ( ठाकरे गट ) शिवसैनिकांना पोलीस आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून दबाब टाकला जात असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदार, खासदार, उपनेते, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केल्याचं सांगितलं जात आहे.

उद्धव ठाकरेंनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याचे निर्देश दिल्याचं माहिती मिळत आहे. प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप होण्याची शक्यता लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी हे आदेश दिल्याचं सांगण्यात येतं. यावर आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “सत्यजीत तांबे भाजपात जाणार नाहीत, कारण…”, दीपक केसरकरांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “पाठिंबा.,,”!

‘एबीपी माझा’शी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, “अशा कोणत्याही सूचना करण्यात आल्या नाही. पण, सध्याच्या राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरलं होत असतात. त्यामुळे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या सुरक्षेसाठी आयफोन वापरावा. अशा सूचना जिल्ह्यात दिल्या आहेत.”

हेही वाचा : “कोणत्याही परिस्थितीत मला अटक होणार”, जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यावरून अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना खडसावलं; म्हणाले…

“तत्कालीन सरकारने रश्मी शुक्लाला फोन टॅपिंग करण्यास सांगितलं होतं. सरकारचं जाणीपूर्वक सर्व हालचालींवर लक्ष असतं. आताचं सरकार कोणत्याही स्तराला जावू शकते. हे सरकार छोट्या-छोट्या शिवसैनिकांना त्रास देत आहे. त्यामुळे सरकारवर विश्वास असण्याचा प्रश्नच येत नाही. सरकार गैरफायदा घेऊ शकतं. म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना देत असतो,” असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 14:27 IST