काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. जामीन मिळून बाहेर येत नाही तोच ७२ तासांत आव्हाडांवर महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी खळबळजनक दावा केला आहे. कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्यात येईल, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “जितेंद्र आव्हाडांवर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकारणात कधी कोण सत्तेत, तर कधी विरोधी पक्षात असतं. राजकीय द्वेषातून कधी कोणीच त्रास देऊ नये. आमचं सरकार असताना आताचे सत्ताधारी म्हणतात की काही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा : “संगमनेरमध्ये चौथीच्या मुलांनी मतदान केलं की…”, मविआ उमेदवार शुभांगी पाटलांचं वक्तव्य

मात्र, “गेली ३० ते ३२ वर्ष झालं काम राजकारणात काम करतो. कधी सत्ता असताना त्या त्याचा गैरवापर करून जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला नाही. कायदा, नियम आणि संविधान सर्वांना समान आहे. कायदा आणि घटनेचा विचार करून सर्वांनी पुढं गेलं पाहिजे,” असं अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना खडसावलं आहे.

हेही वाचा : “गब्बर सिंगवर बक्षीस लावलं होतं तसं आमीष दाखवून…” कोयता गँगवर पुणे पोलिसांनी लावलेल्या बक्षीसावर अजित पवारांचं भाष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

“केंद्रातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्यात येईल. ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत अथवा त्यानंतर काही महिने जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. पण, ही बातमी मिळते तेव्हा आश्चर्य वाटतं,” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं होतं.