Uddhav Thackeray Interview Today: काँग्रेससोबत गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं असं तुम्ही म्हणात असाल तर, मग मुफ्ती मोहम्मद आणि मेहबुबा मुफ्तीसोबत गेलात तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? अशी विचारणा शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला केली आहे. दिल्लीत खुर्चीला असा कोणता स्प्रे मारला आहे ज्यामुळे, ज्यांनी जपलं त्यांनाच संपवायला निघाला आहात असंही त्यांनी विचारलं आहे. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Uddhav Thackeray Interview: पाहा उद्धव ठाकरेंची संपूर्ण मुलाखत

“महाराष्ट्राच्या मातीत कसे काय जन्माला…”, ‘काय झाडी, काय डोंगार’ फेम शहाजीबापू पाटील यांच्यावर उद्धव ठाकरेंची टीका

शिवसेनेवरील सूड घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या अस्तित्वाला सुरुंग लावला जात आहे का? असं संजय राऊत यांनी विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले “याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. जोपर्यंत हे दिल्लीत गेले नव्हते, तोपर्यंत बाळासाहेब ठाकरेच यांना जपत आणि वाचवत आले होते. एका हिंदुत्वाच्या ध्यासापायी, वेडापायी बाळासाहेबांनी त्यांना वाचवलं होतं. मग दिल्लीत खुर्चीला असा काय स्प्रे मारला आहे की, ज्यांनी जपलं त्यांनाच संपवायला निघाला आहात”.

“तेव्हा तुम्ही लाज सोडली होती ना”

“ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने बाबरीची जबाबदारी घेतली होती, त्याच शिवसेनेला हिंदुत्व सोडलं म्हणत तुम्ही संपवायला निघाला आहात. काँग्रेससोबत गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं असं तुम्ही म्हणत आहात, मग मुफ्ती मोहम्मद आणि मेहबुबा मुफ्तीसोबत गेलात तेव्हा काय सोडलं होतं? तेव्हा तुम्ही लाज सोडली होती ना,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

“…आईला गिळायला निघालेली औलाद,” उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांवर संतापले; म्हणाले “माझंच चुकलं”

“मेहबुबा मुफ्ती आजही वंदे मातरम, भारतमाता की जय म्हणतात का? तिकडे निवडणुका घेऊन दाखवा असं आव्हान अतिरेक्यांनी दिलं होतं, म्हणून आम्ही निवडणुका घेऊन दाखवल्या असं त्यांनी सांगितलं होतं. पण सरकार झाल्यानंतर मुफ्ती मोहम्मद सईदने काश्मीर खोऱ्यात शांततेत निवडणूक झाल्याबद्दल पाकिस्तानचे आभार मानल होते,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.

“नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का?”

“नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? त्यांनी एकदा संघमुक्त भारत असा नारा दिला होता. राममंदिराच्या मुद्द्यावर रामविलास पासवान एनडीएतून बाहेर पडल्यानंतरही त्यांना प्रिय होते. आम्ही तर उलट विशेष कायदा तयार करा सांगत होतो. पाच, सात वर्ष झाले तरी ते राममंदिर उभारु शकले नव्हते, न्यायालयाने तो निकाल दिला,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

देशातील विरोधीपक्ष, प्रादेशिक पक्ष आणि मित्रपक्ष संपवण्याचं काही कारस्थान दिसत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं “हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. मध्यंतरी सरन्यायाधीशांनी देशात विरोधी पक्षाला शत्रू समजू नका असं सांगितलं. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने जबाबदारीने वागलं पाहिजे. मी अडीच वर्षात मुख्यमंत्री असता विरोधी पक्षांना सरकार म्हणून आमचं काही चुकत असेल तर नजरेत आणून द्या असं आवाहन केलं होतं. ते विरोधी पक्षाचं काम आहे, तेदेखील लोकप्रतिनिधी असतात. सशक्त लोकशाहीसाठी विरोधी पक्षही तितकाच सुसंस्कृत, संवदेशनशील पाहिजे. त्याहून थोडा जास्त सत्ताधारी पक्ष सुसंस्कृत, संवदेशनशील हवा. आता ही संवदेनशीलता, सुसंस्कृतपणा रसातळाला जात आहे. पिढ्या बदलत असून सत्तेची हाव असल्याने हे होत आहे”.

“सध्या फास्ट फूडचा जमाना आहे, तसंच पक्षात गेल्यावर काही दिवसात काहीतरी मिळालंच पाहिजे अशी अपेक्षा असते, नाही मिळालं तर दुसरं आहे,” असा टोला त्यांनी लगावला. जनता सार्वभौम आहे आणि एखादा निर्णय जनतेच्या मनाविरोधात गेला तर थांबत नाही, तर ती रस्त्यावर उतरते असा इशाराही त्यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray interview sanjay raut balasaheb thackeray rebel mla bjp delhi central government sgy
First published on: 26-07-2022 at 09:36 IST