मुंबई- बंगळुरू महामार्गावर शिवशाही बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ब्रेक फेल झाल्याने बसने आठ वाहनांना धडक दिली. धडक दिलेल्या वाहनांमध्ये तीन दुचाकींचा समावेश आहे. या घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. अशी माहिती पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले आहेत. मुंबई- बंगळुरू महामार्गावर हा अपघात झाला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, म्हणाले “रमेश लटकेंच्या आत्म्याला…”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवलीहून साताऱ्याला जाणाऱ्या शिवशाही बसचा अपघात झाला आहे. यात पाच जण जखमी झाले आहेत. पाषाण तलावाजवळ बसचा ब्रेक फेल झाल्याने समोरील वाहनांना बसने धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की धडकेनंतर वाहने एकमेकांवर आदळली असून एकूण आठ वाहनांच मोठं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivshahi bus collided with eight vehicles due to brake failure on mumbai bangalore highway dpj
First published on: 16-10-2022 at 16:55 IST