मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीनजिक वागदे येथे अपघात घडला. उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून दुचाकीची धडक बसल्याने कणकवली येथील दोन तरुण जागीच ठार झाले. वागदे येथे कंटेनर महामार्गावर उभा असताना कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची धडक उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून बसल्याने दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण ठार झाले.

हेही वाचा – कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा; कोकण व गोवामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार

हेही वाचा – Raj Thackeray Press Conference: “शपथा कसल्या घेताय? तुमच्या हातात…”, राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला; ‘त्या’ कृतीवरून केली टीका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातात मृत झालेल्यांमध्ये कणकवली परबवाडी येथील संकेत नरेंद्र सावंत (वय २४) व कणकवली विद्यानगर येथील साहिल संतोष भगत (वय २३) यांचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. काल संध्याकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. रात्री पावसाचा जोर वाढला होता. पावसामुळे या दुचाकीस्वारांना रस्त्याचा अंदाज आला नसावा अशी शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली.