राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देणे, घरभाडे भत्ता देणे यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कामगारांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे. पण या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने गुरुवारीही उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीने घेतला आहे. दरम्यान, उपोषणात कामगार सामील झाल्याने राज्यातील ११ आगार पूर्णत: बंद आहेत. तर आंदोलनाला पाठिंबा म्हणून पालघर विभागातील सहा एसटी डेपो बंद ठेवण्यात आले आहेत.

एस.टी.कर्मचारी कृती समितीतर्फे पालघर विभागातील पदाधिकारी व कामगार यांनी उपोषण सुरु केले उपोषण आंदोलन तीव्र झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पालघर विभागातील पालघर, बोईसर, वसई, अर्नाळा व डहाणू एसटी आगारातील बस सेवा खंडित ठेवली आहे.

विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगार संघटनांनी उपोषण सुरु केले असून त्यात एसटीतील १७ संघटना सामील आहेत. महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेतर्फे बुधवारपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ८/१६/२४ टक्के मिळावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सणउचल १२५०० रुपये मिळावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्या प्रमाणे वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्के मिळावा, दिवाळी भेट म्हणून १५ हजार रुपयांची नधी मिळावा अशा प्रमुख मागण्यांकरता आमरण उपोषण आंदोलन विभागीय कार्यालयासमोर छेडले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करून पालघर विभागातील पालघर, बोईसर, वसई नालासोपारा, अर्नाळा, डहाणू या आगारामधील एसटी सेवा बंद ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. विविध आगारांमधून बाहेर पडणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर देखील परिणाम झाला.