सांगली: सांगलीतील रिलायन्स ज्वेल्समधील १४ कोटींच्या लूट प्रकरणी चार संशयितांची रेखाचित्रे गुरूवारी पोलीसांनी प्रसिध्द केली. भरदिवसा टाकण्यात आलेल्या या दरोड्यातील संशयितांना पकडण्यासाठी पोलीसांची पथके हैद्राबाद, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये रवाना करण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी मार्केट यार्डाजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सुवर्ण व हिरेजडित अलंकाराच्या दुकानावर अज्ञातांनी धाडसी दरोडा टाकून गोळीबार करीत १४ कोटींचे दागिने लुटले होते. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने पोलीस यंत्रणेसह सांगली हादरली आहे.

आणखी वाचा-कर्जबाजारी झाला म्हणून मंदीरात केली चोरी, थेरोंडा येथील मंदिरातील चोरीचा पोलिसांकडून उलगडा

या दुकानात काम करीत असलेल्या कर्मचार्‍यांना एका ठिकाणी जमा करून हाताला व तोंडाला चिकटपट्टी लावून दरोडेखोरांनी ही लूट केली होती. त्यांनी वापरलेली मोटार भोसे येथे बेवारस अवस्थेत सोडून देण्यात आल्याचे सोमवारी दिसून आले. या कर्मचार्‍याकडून संशयितांच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित चार तरूणांची रेखाचित्रे पोलीसांनी तयार करवून घेतली असून ही रेखाचित्रे गुरूवारी प्रसिध्द करण्यात आली आहेत.

कर्मचार्‍याकडून संशयितांच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित चार तरूणांची रेखाचित्रे पोलीसांनी तयार करवून घेतली

दरोडा टाकण्यापुर्वी काही संशयित खरेदीच्या बहाण्याने दुकानात येऊन गेल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली असून यावरून रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दरोड्यासाठी वापरण्यात आलेल्या मोटारीमध्ये कपडे, रिव्हॉल्व्हर मिळाले असून त्याची चिकित्सा तज्ञांकडून करण्यात येत आहे.

आणखी वाचा-सांगली: दोन ट्रकची धडक; एक ठार, तिघे जखमी

या दरोड्यातील सहभागी संशयितांनी आंध्र प्रदेशमध्ये पलायन केले असल्याच्या शययतेने पोलीस हैद्राबादमध्ये माहिती घेण्यासाठी गेले आहेत, या दरोड्याची उकल करण्यासाठी पोलीसांची नउ पथके तैनात करण्यात आली असून काही पथके उत्तर प्रदेश व बिहारमध्ये रवाना करण्यात आली आहेत. या दरोड्यामध्ये दरोडेखोरांनी संपर्कासाठी उङ्ख तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून या दरोड्याचा मुख्य सूत्रधार शोधण्याचे पोलीसांसमोर आव्हान आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sketches of reliance jewels robbery suspects released mrj
First published on: 08-06-2023 at 21:14 IST