लोकहितवादी संत तुकाराम, शाहू, फुले आंबेडकर, साने गुरुजी इत्यादींच्या पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा जपणारे व तो वसा पुढे चालू ठेवणारे समाजवादी परिवारातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवारी (फॅसिस्ट शक्ती) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या भ्याड हल्ल्याचा निषेध पेणच्या तहसीलदारांकडून करण्यात आला. मारेकऱ्यांना लवकर अटक करून कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ज्या कार्यासाठी आपले जीवन अर्पित केले, त्या कार्याबाबतचे जादूटोणाविरोधी विधेयक गेली १८ वर्षे आपल्याकडे पडून आहे. ते लवकर मंजूर व्हावे, अशी मागणी तहसीलदारांनी केली. पत्राद्वारे श्रमिक क्रांती संघटना, साकव संस्था, अंकुर ट्रस्ट, मानव मित्र दल, युसूफ मेहेरअली सेंटर-तारा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती-पेण शाखा, विनोबा आश्रम- गोगादे म. गांधी स्मारक संस्था-पेण व लोकशाही पुरोगामी विचार कार्यावर श्रद्धा ठेवणारे कार्यकर्ते व नागरिक यांनी या मागणीला पाठिंबा दिला. पुरोगामी विचार आणखी बळकट करून डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी सुरू केलेले समाजपरिवर्तनाचे आंदोलन आणखी व्यापक करण्याचा निर्धार या वेळी सर्वानी केला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2013 रोजी प्रकाशित
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा सामाजिक संघटनांकडून निषेध
लोकहितवादी संत तुकाराम, शाहू, फुले आंबेडकर, साने गुरुजी इत्यादींच्या पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा जपणारे व तो वसा पुढे चालू ठेवणारे समाजवादी परिवारातील...
First published on: 22-08-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social organisation condemns murder of dabholkar