सोलापूर : माढा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर प्रेमाची भुरळ पाडून दोन वर्षे लैंगिक अत्याचार केला आणि नंतर जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल विष्णू साधू शिंदे (वय ३९) या आरोपीला बार्शीच्या विशेष जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

या खटल्यात पीडित मुलीच्या पालकांनी माढा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. परंतु नंतर ते फितूर झाले होते. पोलीस तपास अंमलदाराने या संदर्भात दिलेल्या साक्षीमुळे न्यायालयाने फिर्यादीची साक्ष मान्य केली. विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी या खटल्याचा निकाल सुनावला.

हेही वाचा – Akshay Shinde Encounter : “अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन होणार नाही तर..”, वकिलाने सांगितलं कारण

हेही वाचा – Raj Thackeray : “शिवसेनेतल्या राजकारणाला कंटाळून मी…”, राज ठाकरेंनी सांगितला २४ वर्षांपूर्वीचा किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माढा तालुक्यातील एका गावात पीडित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आणि नंतर तिला जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार २९ फेब्रुवारी २०२० रोजी घडला होता. तिच्या पालकांनी माढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो) आरोपी विष्णू शिंदे यास २ मार्च २०२० रोजी अटक केली होती. तपासांती सबळ पुरावे गोळा करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी आरोपीला दोषी ठरवून त्यास २० वर्षे सक्तमुजरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.