सोलापूर : सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर उजनी धरणाच्या पायथ्याला पर्यटन केंद्र उभारण्यासह सोलापूर जिल्ह्यात एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उजनी पर्यटन विकास आराखडा सादर केला. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव दाखल केल्यास सुरुवातीला शंभर कोटींचा निधी राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात उपलब्ध करून देण्याची ग्वाही पवार यांनी या बैठकीत दिली.

पुण्यात विधान भवनात झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील एकात्मिक पर्यटन विकासावर चर्चा झाली. उजनी पर्यटन केंद्र उभारणीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पुढाकार घेऊन चालना दिली होती. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने उजनी धरणालगतची सहा हेक्टर जमीन जलसंपदा विभागाकडे मागितली होती. मात्र जमिनीच्या मोबदल्याचा मुद्दा प्रलंबित आहे. उजनी धरणाच्या परिसरात कृष्णा खोरे विकास महामंडळाची जमीन आहे. धरणाची उभारणी होऊन ४२ वर्षांचा कालावधी लोटला आहे. धरणाच्या मूळ आराखड्यात धरणाच्या पायथ्यास उजव्या तीरावर ४३.२६ हेक्टर जमीन पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान आणि म्हैसूरच्या वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर उद्यान विकसित करण्यासाठी आरक्षित आहे. परंतु या जागेवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणे केलेल्या स्थानिकांकडून या उजनी पर्यटन केंद्राच्या उभारणीला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमणमुक्त सहा हेक्टर जमीन एमटीडीसीने यापूर्वीच मागितली आहे.

water storage increasing in ujani dam
उजनी धरणात पाण्याचा विसर्ग वाढल्याने सोलापूरकर सुखावले 
rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
medical colleges, maharashtra,
राज्यात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी! जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात होणार
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
NCP mla disqualification case -Sharad Pawar
“लवकरच न्याय मिळणार”, पक्षफुटीच्या प्रकरणावरील सरन्यायाधीशांच्या ‘त्या’ टिप्पणीमुळे शरद पवार गटाच्या आशा पल्लवित
sharad pawar marathi news (1)
अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!

हेही वाचा – “अजित पवारांना भाजपाकडून बाजूला केलं जातं आहे, रोज..”; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

उजनी धरणाकडे स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन म्हणून पाहिले जाते. धरणावर दरवर्षी युरोपसह अन्य देशांतून पक्षी येतात. हिवाळ्यात रशियाजवळच्या युरेशिया, सायबेरिया, मंगोलिया आदी देशांतून पट्टकदंब हंस, चक्रवाक बदक, पाणटिवळे, धोबी यांसह अनेक पक्षी हिमालयाची हिमशिखरे ओलांडून भारतीय उपखंडात येऊन दाखल होत असतात. फ्लेमिंगो पक्ष्याचे विशेष आकर्षण असते. पुढे तीन-चार महिने विविध राज्यांतील जलस्थानांवर वास्तव्य करून पुन्हा आपल्या मूळ प्रदेशांकडे हे पक्षी निघून जातात. उजनी जलाशयावर विविध २२० प्रजातींचे पक्षी येतात. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी अभ्यासकांसह पक्षी व निसर्गप्रेमींची गर्दी होते. तसेच उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा खालावतो, तेव्हा उघड्यावर पडणारे प्राचीन पळसदेव मंदिर, कुगाव येथील आदिलशाहीकालीन ऐतिहासिक इनामदारांची गढी पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढते. त्यामुळे उजनी धरणाच्या पायथ्याला पर्यटन केंद्र उभारल्यास मोठ्या प्रमाणावरआर्थिक चालना मिळू शकते.

हेही वाचा – ‘रामदेव बाबांना जमीन दिलेली चालते, मग वक्फ बोर्डाची काय अडचण?’ काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा सवाल

या पार्श्वभूमीवर उजनी पर्यटन केंद्राचा प्रस्ताव पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केलेल्या उजनी पर्यटन विकास आराखड्यामध्ये उजनी बॅकवॉटर क्षेत्रात जल क्रीडा केंद्र उभारण्याचा मुद्दा समाविष्ट आहे. या बैठकीस करमाळ्याचे आमदार संजय शिंदे व पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.