सोलापूर : आर्थिक रसातळाला गेलेल्या सोलापूर जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाची यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. अखेर यात प्रस्थापित शेतकरी विकास पॅनलने बाजी मारून एकहाती वर्चस्व मिळविले. प्रतिस्पर्धी दूध संघ बचाव पॕनेलला दारूण निराशा पत्करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सुनेचाही पराभव झाला.


वर्षानुवर्षे प्रस्थापित नेत्यांच्या ताब्यात असलेला जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ अलिकडे आर्थिकदृष्ट्या डबघाईला येऊन शेवटची घटका मोजत असताना शेवटी शासनाने दूध संघावर प्रशासकीय मंडळ नियुक्त केले होते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार दूध संघाची निवडणूक घ्यावी लागली. या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांनी पुन्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी स्वतःचे पॕनेल उभे केले होते. त्या विरोधात दूध संघ बचाव पॕनेलने आव्हान दिले होते. बचाव पॕनेलने केलेल्या आक्रमक प्रचारामुळे तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सून वैशाली जितेंद्र साठे बचाव पॕनेलतर्फे उभ्या राहिल्यामुळे निवडणूक चुरशीची, प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी ठरली होती.विरोधात यंदा दूध संघ बचाव कृती समितीने आव्हान दिले होते.

Sunil Tatkare criticism that repolling is demanded for fear of defeat in Beed
बीडमध्ये पराभवाच्या भीतीने फेरमतदानाची मागणी; सुनील तटकरे यांची टीका
The people of Dharavi will benefit from rehabilitation Rahul Shewale
उमेदवारांची भूमिका- दक्षिण मध्य मुंबई; पुनर्वसनातून धारावीकरांचा फायदाच होईल- राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट)
Allegation session of Congress MLA Vikas Thackeray Regarding malpractice in Nagpur Municipal Corporation
काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचे आरोपसत्र, रोख कोणाकडे?
Konkan Graduate Constituency, congress, uddhav Thackeray shivsena, congress demand Konkan Graduate Constituency , maha vikas aghadi, sattakaran article,
लोकसभेला मदत केली, पदवीधरची जागा आम्हाला द्या; काँग्रेसचा ठाकरे गटाला सल्ला..
Dhule lok sabha, BJP,
मतदारसंघाचा आढावा : धुळे; विरोधी मतांचे विभाजन टळल्याने भाजपपुढे आव्हान
Solapur, vote, temperature, BJP,
सोलापूर : वाढत्या तापमानात मतांचा टक्का वाढविण्याचे आव्हान; भाजपच्या प्रतिष्ठेची, तर काँग्रेस व शरद पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई
Solapur lok sabha, solapur, political party,
सोलापूर : कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा ? विविध समाजामध्ये विभागणी
Congress, reservation, Muslims,
हिंदूंना एकमेकांत लढवून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेसचा मनसुबा, योगी आदित्यनाथांचा आरोप


रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एक जागा प्रस्थापित गटाने बिनविरोध जिंकल्यामुळे उर्वरीत १६ जागांसाठी ३१ उमेदवार उभे होते. एकूण ३१६ पैकी ३१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर लगेचच मतमोजणीही झाली. यात प्रस्थापित गटाचे सर्व १६ उमेदवार निवडून आले. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार रणजितसिंह शिंदे व बार्शीचे ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांचे पुतणे योगेश सोपल यांचा निवडून आलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे.


पंढरपूर-मंगळवेढ्याचे भाजपचे आमदार समाधान अवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे (१८९ मते ), रणजितसिंह शिंदे (२०७), योगेश सोपल (२०१), मनोज गरड (१८९), अलका चौगुले (२०२), बाळासाहेब माळी (२२७), राजेंद्र मोरे (२१८), संभाजी मोरे (२१४), विजय येलपले (२११),
मारुती लवटे (२२६), औदुंबर वाडदेकर (२१८), वैशाली शेंबडे (१९९), राजेंद्रसिंह पाटील (२३५) आदींचा विजयी उमेदवारांचा समावेश आहे.