Today’s News Update : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. निवडणुकीतील मतदानाचे सहा टप्पे पार पडले असून १ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या दिवशी उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसह इतर आठ राज्यांमधील ५७ जागांवर मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी या मतदारसंघांकडे मोर्चा वळवला आहे. महाराष्ट्रातील मतदान पार पडलं असून आता सर्वांना केवळ निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विधान परिषद आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून राज्यातील सर्व पक्ष या निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
Marathi News Updates 28 May 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या
संबंधिताचे जक्कल काळे याच्या दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याच्या डोक्यात दगड घालून जखमी केले होते.
शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शैक्षणिक संकुलाची श्रेणी वाढ झाली आहे.
डाळिंब शेती करत सव्वा कोटीचे उत्पन्न घेणाऱ्या प्रणवने शाळेचे तोंडही न पाहता ४८.२० टक्के गुण मिळवून यशाचे शिखर गाठले.
प्रेमीयुगुलांचे संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आले असून त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याबाबत विविध तर्क लावले जात आहे.
या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे. सचिन वामनराव पेठारे, असे उष्माघाताने मृत्यू पावलेल्या ४० वर्षीय मजुराचे नाव आहे.
ऊस तोडणी व वाहतूक या दोन मोठ्या समस्या गंभीर बनत चालल्या आहेत. या दोन बाबींवर तब्बल २५ टक्के खर्च होतो.
अडीच लाखांची रक्कम कंपनीत गुंतवल्यास एका वर्षात तीन लाख ६५ हजारांची रक्कम बँक खात्यावर जमा होईल, असे म्हणून विश्वास संपादन करत सोहेल पटेल याने वळसंगकर गुरूजींना गुंतवणूक करण्यास राजी केले.
' ना नफा ना तोटा ' या तत्वावर मोफत व माफक दरात पारदर्शक सेवा देणासाठी अत्याधुनिक असा हृदयरोग विभाग कार्यरत आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे शेवटचे ६ डबे पालघर येथे रुळावरून घसरले. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता ही दुर्घटना घडली. गार्डसह शेवटचे ६ डबे रुळावरून घसरले आणि ते २ आणि ४ क्रमांकांच्या रुळावर आले. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईहून पालघरच्या दिशेने येणारी वाहतूक मात्र धीम्या गतीने सुरू आहे. रुळावरील डबे हटविण्याचे काम सध्या सुरू आहे.
घराला कुलूप दिसले की त्या घरी चोरी होणारच, एवढी दहशत सध्या चोरट्यांनी शहरात निर्माण केली.
पती व पत्नीमध्ये प्रेम, विश्वास व जिव्हाळ्याचे नाते असते. हे नाते साताजन्माचे असल्याची भावना भारतीयांच्या मनात आहे.
पुणे : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील ३९० तंत्रनिकेतनांतील (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून (२९ मे) सुरू होणार आहे. १ लाख ५ हजार जागांसाठी विद्यार्थ्यांना २५ जूनपर्यंत अर्ज भरता येणार असून, अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला जाहीर केली जाणार आहे. प्रवेशासाठी तीन फेऱ्या राबवल्या जाणार आहेत.
दोन्ही तरुण बँक फायनान्सचे काम करीत होते. त्यांना या क्षेत्रात खूप पुढे जायचे होते. परंतु, रितिकाच्या नशेने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले.
यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदीसाठी पहाटेपासूनच रांगा दिसून येत आहेत.
रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकानेच वैद्यकीय देयकांवर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सह्या केल्याचे उघडकीस आले आहे.
उष्णतेवर मात करण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर ही प्रणाली बसवण्यात आली असून प्रवाशांना थोडासा का होईना गारवा मिळू लागला आहे.
२०१७ मध्ये छत्तीसगडच्या मिरतूर आणि २०२२ मध्ये तिम्मेनार येथे झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता.
नागपुरातील धंतोलीतील सरस्वती नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. पण ही शाळा व यातील विद्यार्थी इतर शाळांपेक्षा वेगळे आहेत.
कल्याण : ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर तातडीने कारवाई सुरू करा. या कारवाईत कोणीही पोलीस अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला तर, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणे पोलीस आयुक्त डॉ. आशुतोष डुंबरे यांनी मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या परिमंडळातील पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिला.
उरण : मुंबईतील घाटकोपरच्या फलक अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर शासनाने आदेश देताच सिडकोने उरण-पनवेलमधील २५ पेक्षा अधिक बेकायदा फलक हटविण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
नवी मुंबई: १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात वावरत असतानाचे गुपचूप फोटो काढून समाज माध्यमात टाकणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेले नाही.
नवतपाच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा आलेख वर चढत असताना, आता नवतपा सुरू झाल्यानंतर तो आणखी वेगाने वर जात आहे.
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान रासायनिक कंपनीत स्फोट झाला आहे. कामगारांचा नाहक जीव गेले आहेत. अनेक जखमी झाले आहेत. आजुबाजुच्या कंपन्या बेचिराख झाल्या आहेत. याचे दुःख सर्वच उद्योजकांना आहे. आता स्फोटानंतरची सर्व परिस्थिती सुव्यवस्थित होण्यासाठी सर्व उद्योजक प्रयत्नशील आहेत.
बोरगावमंजू गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
मुंबईः मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचा बनाव करून कॅफे म्हैसूर या हॉटेलच्या मालकाला ७२ लाख रुपयांना लुटल्याप्रकरणी लवकरच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी आठ जणांना शीव पोलिसांनी अटक केली होती.
पुणे : कल्याणीनगर अपघातानंतर दुसरा मोठा अपघात खराडी जुना जकातनाका येथे घडला. नगर रस्त्यावर खराडी जकात नाका येथे भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोन महाविद्यालयीन तरुणांना धडक दिली.
या प्रकरणात पुणेतील ससून रुग्णालयातील दोन्ही डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून दुसऱ्याचे नमुने न्यायवैद्यकशाळेत तपासणीला पाठवले होते.
“मी दैवी अंश, मी युद्ध रोखलं, अशा मुंगेरीलालच्या गोष्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, सलमान खुर्शीद यांचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत मी दैवी अंश असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर आता काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी टीका केली आहे. खुर्शीद म्हणाले, आता आमच्यासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे कारण आत्तापर्यंत आमच्यासमोर माणसं एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. आता तसं नाहीये एक माणूस स्वतःला म्हणतोय मी माणूस नाहीच. जैविकदृष्ट्या माझा जन्मच झालेला नाही. असं कुणी म्हणत असेल तर यावर काय उत्तर द्यायचं? आम्ही डीएनए टेस्ट करा म्हणू शकतो. कारण अशा गोष्टी नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये केल्या जातात. कल्पनाविश्वात अशा गोष्टी बोलल्या जातात. आम्ही याबाबत काय उत्तर देणार? चीनने इतकी जमिनीवर कब्जा केला आहे, त्याबद्दल मोदी काहीच बोलत नाहीत. मुंगेरीलालच्या किती गोष्टी निवडणूक प्रचारात आम्ही किती ऐकायच्या आहेत? आता किमान मोदींनी या मुंगेरीलालच्या गोष्टी सांगणं बंद कराव.