सोलापूर : शहरातील कर्णिक नगरातील एका घरात दोघा तरुण आणि तरुणीने एकत्रपणे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास उजेडात आली.
मृत तरूण २३ वर्षांचा असून तो शांतीनगर-मड्डी वस्ती भागात राहणारा होता. तर मृत तरूणीही २३ वर्षांची असून ती कर्नाटकात बागलकोट जिल्ह्यातील राहणारी होती. या दोघांचे एकमेकांशी काय संबंध होते, हे समजू शकले नाही. दोघे एकत्र येऊन कर्णिक नगरमधील एका घरात छताच्या उंच लोखंडी हुकाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन लटकत असलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस घटनास्थळी होऊन गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.