सोलापूरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनिष काळजे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनिष काळजे हे सतत धमकावत आहेत. त्यांच्या हस्तक्षेपामुळे काम करणे अवघड आहे, असा आरोप येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. याबाबत नर्स संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारही केलेली आहे. तर दुसरीकडे मनिष काळजे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नर्स संघटनेला पुढे करून भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिकाऱ्यांनी हे कटकारस्थान रचले आहे, असा आरोप मनिष काळजे यांनी केला आहे.

हेही वाचा >> मोदी यांच्यावरील माहितीपटाचे ‘बीबीसी’कडून समर्थन; ब्रिटनमधील भारतीय समुदायाकडून मात्र निषेध

Crime against former minister Anil Deshmukh wardha
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा? आदर्श आचारसंहिता…
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

नर्स संघटनांचा नेमका आरोप काय?

सोलापूर जिल्ह्यातील नर्स संघटनेने शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्याकडून धमकावले जात असल्याचा आरोप केला आहे. मनिष काळजे हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आहेत. नर्स संघटनेने त्यांच्याविरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांच्यासारखी तुमची अवस्था करेल, असे म्हणत धमकावले जात आहे. तसेच हस्तक्षेप वाढल्यामुळे काम करणे अवघड झाले आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेने केला आहे. तशी लेखी तक्रार या संघनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

हेही वाचा >>निकाह हलाला, बहुपत्नीत्वाबाबत लवकरच नवे घटनापीठ

…तर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर राज्यस्तरीय संघटनेशी संपर्क साधून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. तसेच आरोग्य विभागावरील दबावतंत्र जुगारून देण्यासाठी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत, असा इशाराही महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेने दिला आहे. नर्स संघटनांच्या या इशाऱ्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> नागरिकांना नि:शुल्क ‘नेझल लस’ मिळणे कठीण? ‘भारत बायोटेक’कडे अद्याप सरकारकडून विचारणाच नाही

मनिष निकाळजे यांनी आरोप फेटाळले

दरम्यान शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी नर्सेस संघटनेचे सर्व आरोप फेटाळले आहेत. नर्सेस संघटनेला पुढे करून भ्रष्टाचारात अडकलेल्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून हे कटकारस्थान रचले जात आहे. माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. निलंबित आरोग्य अधिकारी शितल कुमार जाधव यांच्याप्रमाणेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करू. आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराची कीड आम्ही काढून टाकणार आहोत. मी अशा बदनामीला घाबरत नाही. हे सरकार गोरगरिबांचे सरकार आहे. एखादा आरोग्य अधिकारी संघटनांना पुढे करून असे करत असेल, तर योग्य ती कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया मनिष काळजे यांनी दिली.