साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात करोना चाचणी प्रयोगशाळा (आरटी पीसीआर लॅब) उभारण्यास मान्यता दिली आहे. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

राज्य शासनाकडून तातडीची बाब म्हणून साताऱ्यात करोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास मंजूरी देऊन, यासाठी आवश्यक असलेल्या ७५ लाख ४६ हजार १८६ इतका निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यास मंजूरी दिली आहे. या प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रसामुग्री ई टेंडर ऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर यांच्याकडील १८ एप्रिलच्या पुरवठा आदेशानुसार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच, लागणारे आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ व त्यावरील खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत उपलब्ध निधीतून करण्यासही मान्यता दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातारा जिल्ह्यात आरटी पीसीआर लॅब नसल्याने करोनाच्या चाचणीसाठी रुग्णांचे स्वॅब नमुने पुणे येथे पाठवावे लागत आहेत. जिल्ह्यात येणारी बहुतांश कुटुंबे ही कंटेनमेंट, हॉटस्पॉट व रेड झोनमधील असल्याने या सर्व नागरिकांचे लक्षणे दिसत असल्यास करोना तपासणी करणे अनिवार्य ठरत आहे. तपासणीसाठी व अहवाल प्राप्तीसाठी लागणारा कालावधी बघता प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत आहे व मोठ्या प्रमाणावर खर्चही होत आहे. यासाठी ही तपासणी सातारा येथेच तपासणी झाल्यास वेळ आणि खर्च वाचेल, यासाठी सातारा येथेच चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्ह्यातील पालकमंत्री, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागील आठवड्यात केली होती. ही परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा रुग्णालयात आरटी पीसीआर लॅबसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.