सूडबुद्धीने काम करण्याची आमची प्रथा नाही, असा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरूद्ध करण्यात येत असलेली कारवाई पूर्णपणे व्यक्तीनिरपेक्ष आणि कोणताही आकस न ठेवता होत असल्याचे स्पष्ट केले.
भुजबळ यांच्याविरूद्ध सुरू असलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना ही कारवाई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होत असून, त्यात सरकार कोणताही हस्तक्षेप करीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय बेरीज वजाबाकी करण्यासाठी आमचे सरकार सरकारी यंत्रणेचा वापर कधीही करणार नाही. काही विशिष्ठ तक्रारी असतील, तर शासन नियमानुसार कारवाई करणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. मात्र, आम्ही सूडबुद्धीने कोणतीही कारवाई करीत नाही आणि आमची तशी प्रथा नाहीं,असे त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2015 रोजी प्रकाशित
सूडबुद्धीने काम करण्याची आमची प्रथा नाही – मुख्यमंत्री
छगन भुजबळ यांच्याविरूद्ध करण्यात येत असलेली कारवाई पूर्णपणे व्यक्तीनिरपेक्ष आणि कोणताही आकस न ठेवता होत असल्याचे स्पष्ट केले.
First published on: 18-06-2015 at 05:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State govt is not interfering in inquiry against chhagan bhujbal says devendra fadnavis