Sudhir Mungantiwar महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताार रविवारी पार पडला आहे. ३९ मंत्र्यांना यात स्थान देण्यात आलं आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे माजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मंत्रिमंडळात तुम्ही आहात असंच मला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं होतं असं सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) म्हणाले आहेत.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) म्हणाले, मी नाराज नाही, पक्षाने जो आदेश दिला, जबाबदारी दिली त्याचं मी पालन केलं आहे. मला याची जाणीव आहे की मी विधानसभेत आलो असतो तर अनेक जण अनेक प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा मौनं, सर्वार्थ साधनं हे मी मानतो तसंच श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे. संघटनेच्या नव्या आदेशाची वाट पाहतो आहे.

मी भाजपासाठी कायमच जीव लावून काम केलं आहे-मुनगंटीवार

मी नाराज का होईन? मला मागच्या वेळी सांस्कृतिक खातं दिलं होतं. मी तिथे जीव लावून काम केलं. यापुढेही करत राहिन. मंत्री होतो तेव्हा लोकांचे प्रश्न मांडले, आता विधानसभेत आमदार म्हणून प्रश्न मांडेन. निष्ठेने काम करणं हे कर्तव्य होतं आहे आणि राहिल असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मला मंत्रिपद देणार आहे असंच सांगितलं होतं, मंत्रिमंडळात तुम्ही नाही असं कुणीही सांगितलं नव्हतं. त्यामुळे मी आता नवीन जबाबदारीची वाट पाहतो आहे असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे मत मांडलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज प्रमोद महाजन यांची आठवण येते आहे..

सभागृहाचं आज काहीही काम नाही. मी मंत्री असतो तर सही करावी लागते. तारांकित प्रश्न मांडले जातात. आत्ता काम काही नाही. तारांकीत प्रश्न नाहीत त्यामुळे आलो नाही. या अधिवेशनात औचित्याचे मुद्दे उपस्थित करेन. जनतेचे प्रश्न मांडावेच लागतील. मला मंत्रिमंडळात ज्यांनी घेतलं नाही तेच उत्तर देऊ शकतील की मला मंत्री का केलं नाही. मला काही सांगता येणार नाही. मला मंत्रिमंडळात घेतलं जाणार नाही अशी जाणीव मला कुणी करुन दिली नाही. मी संघटनेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मला प्रमोद महाजन यांचं वाक्य आठवतं आहे पावला-पावलावर मनाविरुद्ध घडत असताना जो काम पुढे नेतो तोच खरा कार्यकर्ता. हे वाक्य मी माझ्या मनात जपून ठेवलं आहे. असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. माझं देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि चंद्रशेखर बावनकुळेंशी बोलणं व्हायचं पण मी मंत्रिमंडळात नाही हे काही मला जाणवलं नाही. माझं नाव मंत्रिमंडळात आहे हे सांगण्यात आलं होतं असंही सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) म्हणाले. मला दोन्ही नेत्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही नाव आहे हेच सांगितलं होतं. असंही मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी स्पष्ट केलं.