रेल्वे रुळावर बसून महिलेने आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी शिवारात शुक्रवारी सकाळी घडली.
जयश्री सुभाष सोनटक्के (वय ४०, भंडारी) असे या महिलेचे नाव आहे. ढोकी येथे वास्तव्यास असलेली ही महिला शुक्रवारी ढोकी शिवारातील नारायण समुद्रे यांच्या शेताजवळील रेल्वे स्टोन क्रमांक ४७६/४जवळील रुळावर बसली होती. कुर्डूवाडीकडून लातूरला जाणाऱ्या डबल इंजिन मालगाडीने या महिलेस चिरडले. त्यात तिचा मृत्यू झाला. ढोकी रेल्वे स्टेशनचे प्रबंधक अजयकुमार योगेंद्र झा यांनी दिलेल्या माहितीवरून ढोकी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत जयश्री यांच्यामागे मुलगा, मुलगी असा परिवार आहे.