राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी अद्याप या जागेची घोषणा केलेली नाही. मात्र बारामतीचा सस्पेन्स थोडा राहू दे, तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव असणार आहे असं अजित पवारांनी म्हटलं आहे. अशात सुनेत्रा पवार यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये अजित पवार यांची तुलना सुनेत्रा पवारांनी श्रीकृष्णाशी केली आहे. ही फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.

काय आहे सुनेत्रा पवार यांची फेसबुक पोस्ट?

सारोळ्यात सगळेच एकवटले..!

Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

अवघ्या काही दिवसात आज पुन्हा सहाव्यांदा भोर वेल्हे मुळशी विधानसभा मतदार संघात सदिच्छा भेटीसाठी दखल झाले. सारोळा येथून या भेटींचा प्रारंभ करताना सर्वप्रथम वंदन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यानंतर झालेल्या सदिच्छा भेटीत महायुतीतील सर्वच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले.

महायुतीतील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विकासकामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पक्षीय राजकारणापलिकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला २४ तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. अशा अनेक भावना सर्वांकडून पोटतिडकीने व्यक्त होत होत्या. त्या भावनातून लोकसभा निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची दखल मी घेतली असून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी कोणतीही कसूर ठेवणार नाही. ज्या ठिकाणी ही सदिच्छा भेट झाली ते ठिकाण पाहून मला माझ्या आजोळची आठवण झाली. त्या अर्थाने आजोळातून मिळणारे प्रेम मला सारोळा येथे मिळणार याची खात्री येथील एकजुटीने मिळाली.

हेही वाचा- ‘अजित पवारांनी पक्ष चोरला’, या आरोपावर पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांचं उत्तर, “लोकशाहीत…”

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेना तालकाप्रमुख अमोल पांगारे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुनिल गायकवाड, भालचंद्र जगताप, रणजीत शिवतरे, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, बाळासाहेब गरुड, विद्याताई पांगारे, नीलम झांजले, अर्जुनराव अहिरे, गणेश निगडे, महेंद्र भोरडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचे मनापासून आभार.

श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, असं सुनेत्रा पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांच्या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी ही पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टची चर्चा होत आहे. सुनेत्रा पवार आज भोर, वेल्हा, मुळशी दौऱ्यावर होत्या. सारोळा येथील नागरिकांचीही त्यांनी भेट घेतली. सारोळा येथे सुनेत्रा पवार यांना आली त्यांच्या आजोळची आठवण आली, अशा भावना त्यांनी फेसबुक पोस्टमधून व्यक्त केल्या. या निमित्ताने पवार कुटुंबातलं महाभारत चर्चेत आलं आहे. कारण काही दिवसांपूर्वीच श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांची साथ सोडल्याचं जाहीर केलं होतं. शर्मिला पवार यांनीही अजित पवारांवर टीका केली होती. अशात आता सुनेत्रा पवार यांनी एक प्रकारे श्रीकृष्णाची उपमा अजित पवारांना देत अजित पवारांच्या विरोधात जाणाऱ्या कुटुंबीयांना सुनावलं आहे.