महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला होता. सीमाप्रश्नावरून रोज उठून बोम्मई महाराष्ट्राच्या कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी खालच्या पातळीवर वक्तव्य केलं होतं. “संजय राऊत हा पिसाळलेला कुत्रा आहे. त्याच्या कानशिलात वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तो आमच्या नेत्याबद्दल असं विधान करत असेल, तर ज्या ठिकाणी तो मिळेल, त्याठिकाणी त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा संतोष बांगर यांनी दिला होता.

आमदार बांगर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; हिंगोलीतील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

संतोष बांगरांना शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “संतोष बांगर आता संजय राऊतांना ठेचणार. जे संजय राऊत म्हणजे संतोष बांगर नव्हे. नुसतं ईडीची नोटीस गेल्यानंतर भाजपाला लोटांगण घातलं. संजय राऊत न झुकता जेलमध्ये गेले. साडेतीन महिने जेलमध्ये काढले पण झुकले नाहीत. संतोष बांगरांच्या तोंडी या गोष्टी शोभत नाहीत. निवडणूक लागूदे शिवसैनिक संतोष बांगरांना ठेचून काढतील. शिवसैनिक कमजोर नाही आम्ही बघून घेऊ,” असं सुनिल राऊत यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil raut reply santosh bangar over sanjay raut comment ssa
First published on: 21-12-2022 at 20:16 IST