Sunil Tatkare : महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. या व्हिडीओत ते रमी खेळताना दिसत होते. सभागृहात माणिकराव कोकाटे असतानाचा हा व्हिडीओ आहे. दरम्यान यावरुन माणिकराव कोकाटेंवर टीकेची झोड उठली. त्यानंतर मी रमी खेळत नव्हतो तर जाहिरात स्कीप करत होतो असं स्पष्टीकरण माणिकराव कोकाटेंनी दिलं. तरीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. तसंच सूरज चव्हाण यांच्याबाबतही भूमिका मांडली.
माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया काय?
“मी विधानपरिषदेत कामकाजासाठी बसलो होतो. तेव्हा सभागृह काही वेळासाठी तहकूब झाले असावे. म्हणून मी खालच्या सभागृहात (विधानसभेत) काय कामकाज सुरू आहे, हे पाहण्यासाठी मोाबाइलवरून युट्यूबवर गेलो होतो. युट्यूबवर व्हिडीओ सुरू केल्यानंतर जाहिराती येत असतात. त्याप्रमाणेच त्यावेळी सदर जाहिरात आपोआप प्ले झाली. मी जाहिरात स्किप करून पुढे गेलो. पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी फक्त १८ सेकंदाचाच व्हिडीओ दाखवला.” दरम्यान सूरज चव्हाण यांचा राजीनामा आम्ही घेतला आहे असं तटकरे म्हणाले माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत काय? याचं उत्तर दिलं.
सूरज चव्हाण यांना राजीनामा द्यायला सांगितला आहे त्यांनी तो दिला आहे-तटकरे
सूरज चव्हाण यांच्याबाबत पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रविवारी झालेल्या प्रकरानंतर पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांना सांगितलं की तुम्ही राजीनामा द्यावा. ज्यानंतर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेशाध्यक्ष पदाचा सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो की लातूर दौऱ्यावर मी होतो. पत्रकारांशी मी बोलत होतो. त्यानंतर छावा संघटनेने त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. लोकशाहीत सत्तेत असलेल्या राज्यकर्त्यांनी संयमी भूमिका घेतली पाहिजे तसंच मी त्यांचं निवेदन स्वीकारलं. लातूरमधल्या व्यावसायिकांशी, इतर तज्ज्ञांशी मी चर्चा केली. एका कर्करोग रुग्णालयाला मी भेट दिली. तिथे जो प्रकार झाला त्याचा मी निषेध नोंदवला. पुढील कारवाई केली जाईल असं सुनील तटकरेंनी म्हटलं आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार घेतील. असंही सुनील तटकरे म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका
जे पदाधिकारी माझ्याकडे निवेदन द्यायला आले होते त्यांच्याशीही मी चर्चा केली. आता पुढची जी काही भूमिका आहे ती पक्ष घेईल. विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर संजय राऊत यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यानंतर ते जसं स्वप्न पाहतात तसं रोज बोलतात, त्यांच्याविषयी विशेष काही बोलावं असं मला वाटत नाही असं तटकरेंनी म्हटलं आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं आहे. त्यांच्याकडून काही चुकीची विधानं गेली आहेत. त्यानंतर त्यांना समज देण्यात आली आहे. पण काल जो प्रकार समोर आला त्यानंतर काय करायचं याचा निर्णय अजित पवार घेतील असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.