राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (रविवार, १६ जुलै) काही मंत्र्यांसह पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती होती. त्यानंतर आज पुन्हा अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील अनेक महत्त्वाचे नेते आणि आमदार उपस्थित होते.

सलग दोन दिवस अजित पवार गटाचे नेते शरद पवारांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीत अजित पवार गटाच्या नेत्यांची शरद पवार यांच्याशी काय चर्चा झाली? यावर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे.

अजित पवार गटाच्या नेत्यांची शरद पवारांशी नेमकी काय चर्चा झाली? असं विचारलं असता सुनील तटकरे म्हणाले, “काल अजित पवारांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाच्या सर्व सहकाऱ्यांनी आमचे दैवत शरद पवारांची भेट घेतली. आज विधानपरिषद आणि विधानसभा सदस्यांनी शरद पवारांची भेट घेतली. आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही सर्वजण तिथे गेलो होतो. कालच्या भेटीबाबतचा संपूर्ण तपशील प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितला आहे. यापेक्षा अधिक मला काहीही सांगायचं नाही.

हेही वाचा- “ओरिजनल गद्दारांच्या बॅचला मंत्रिपदं मिळणार नाहीत”, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील म्हणाले, ती सगळी मंडळी शरद पवार यांना भेटली. त्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. शरद पवार यांना भेटून काल नऊ मंत्र्यांनी जी विनंती केली होती, त्याच विनंतीचा आज पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केला. शरद पवार यांनी त्यांची विनंती ऐकून घेतली.