राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. शिवतारे यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला. दरम्यान, या आरोपानंतर आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – देशाच्या राजकारणाचे चित्र बदलतेय!, शरद पवार यांची टिप्पणी

फेसबूक पोस्ट करत शिवतारेंचे आरोप

खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असा गंभीर आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे. शिवतारे यांनी फेसबुकवर सुप्रिया सुळे यांचा हॉटेलमधील एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओत सुप्रिया सुळे या ‘मी हीच थाळी खाल्ली’ असे म्हणताना दिसून येत आहेत. याशिवाय सुप्रिया सुळे यांनी महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे फोटोही शिवतारे यांनी शेअर केले आहेत.

हेही वाचा – शरद पवारांमुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त!, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवतारे यांनी पोस्ट करताना, ”आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला”, असे कॅप्शनही दिले.