नाशिक शहरातील आरटीओ रोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंना भररस्त्यात लुटलं आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या आईला अशाप्रकारे भररस्त्यात लुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

भारती पवारांच्या आईच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, कृपया आपण कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत गांभीर्याने कार्यवाही करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ट्वीटद्वारे केली.

हेही वाचा- VIDEO: “तुम्ही तुरुंगात होता, तेव्हा काय झालं?”, टोमॅटो दरवाढीबाबत विचारताच स्मृती इराणी पत्रकारावर भडकल्या

सुप्रिया सुळे ट्वीटमध्ये म्हणाल्या, “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गृहखाते निष्क्रिय असल्याने ही स्थिती उद्भवली असून गुन्हेगार निर्ढावले आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. देव त्यांना निरोगी, दिर्घायुष्य देवो. परंतु या घटनेमुळे जर मंत्र्यांचे नातेवाईकही सुरक्षित नाहीत, हे उघड झाले आहे. त्यांची ही स्थिती असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे, की कृपया आपण कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत गांभीर्याने कार्यवाही करावी.”

हेही वाचा- “पक्षात फूट पडली नाही, अजित पवार गटाने…”, रोहित पवारांचं मोठं विधान…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय घडलं?

शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भारती पवार यांच्या आई भाजी खरेदी करण्यासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या बाजारात गेल्या होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली आहे. ऐवज हिसकावल्यानंतर आरोपींनी त्वरित घटनास्थळावरून पळ काढला.