महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. दरम्यान, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी म्हणाले. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी खोचक पद्धतीने या वक्तव्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> व्वा रं पठ्ठ्या… म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंवर साधला निशाणा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेसंदर्भात टीव्ही ९ मराठीशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज यांना आलेला ईडीच्या नोटीशीचा संदर्भ देत टीका केलीय. “लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक आणि आश्चर्य वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी हा आरोप याआधीही केलाय. अशा गोष्टींमध्ये इनकनस्टीस्टंटली कन्सीस्टंट आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

पत्रकाराने राज ठाकरे यांनी थेट शरद पवारांचं नाव घेऊन टीका केल्याचं सुप्रिया यांना सांगत पुढील प्रश्न विचारला. १९९९ साली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवरांना अशापद्धतीचं राजकारण केल्याचं ते म्हणाले, असं सुप्रिया यांना विचारण्यात आलं असता त्यावरुन. त्यांनी मोजक्या शब्दात राज यांच्या टीकेचा समाचार घेतला. “शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय मोठी हेडलाइन होत नाही हे ५५ वर्ष महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे त्यांच नाव घेतलं की कोणाचीही हेडलाइन होते. याचा उपयोग जर पक्षाला होणार असेल तर मला त्याचा आनंद आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नक्की वाचा >> विश्लेषण : राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर चर्चेत आलेलं २१०० कोटींचं ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरण आहे तरी काय?

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा इंदापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना खास शैलीत समाचार घेतला. “टीका आणि नकला करण्याशिवाय राज ठाकरे यांना दुसरे काही जमत नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारविरोधात रान पेटवणारे आता त्यांचीच री ओढून सरड्यासारखे रंग बदलत आहेत. राष्ट्रवादीला आणि शरद पवारांनी जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे स्वत: जास्त जातीयवादी आहेत,” अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना रविवारी प्रत्युत्तर दिले. “शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे,” अशी टिपणीही त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule slams raj thackeray over his comment on sharad pawar scsg
First published on: 04-04-2022 at 10:25 IST