राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीत सध्याच्या निवडणुकीवर भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या राजकीय वारसदारापासून ते अजित पवारांनी बाळासाहेबांविषयी केलेल्या खुलाश्यापर्यंत त्यांनी उत्तरं दिली. यावेळी सुळे यांनी महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री पदासाठी नावही सुचवलं.

खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी शरद पवारांच्या राजकीय वारसदाराबरोबरच अजित पवारांविषयी त्यांनी मत मांडलं. सुप्रिया म्हणाल्या, “शरद पवारांचा राजकीय वारसदार येणारा काळ ठरवेल. तो वारसदार पक्ष आणि कार्यकर्ते ठरवतील. कुठलाही राजकीय पक्ष एका कुटुंबाची मक्तेदारी नाही. यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार शरद पवार ठरले. वारसदार होणे हे काही शेअर्स नाहीत. तो वारसा कुणालाही मिळू शकतो,” असं सांगताना अजित पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविषयी सुळे म्हणाल्या,”अजित पवार नेहमी खरं बोलतात. बाळासाहेब ठाकरेंबद्दलचा तो त्यांचा अनुभव आहे. त्यांना त्या मीटिंगमध्ये अनुभव आला. तो त्यांनी सांगितलं,” असं त्यांनी सांगितलं.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Eknath Shinde and Aditya thackeray
“महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि…”, आदित्य ठाकरेंचा दावा; आव्हान देत म्हणाले…
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”

यावेळी बोलताना महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,”प्रणिती शिंदे. प्रणिती शिंदे वकिल आहे. खूप कष्ट घेते. तसेच स्थानिक पातळीवर तिचं खूप चांगलं काम आहे,” असं सांगतानाच “राज्याच्या राजकारणात येण्याचा विचार नाही. मी संसदेत काम करते. देशात मी प्रत्येक सत्राला पहिली येते. तो लोकांचा विश्वास आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.