Sushma Andhare on Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जागा वाटपाची मोठी चर्चा चालू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत नेते पद दिलेल्या अनेकांची नावे आता उमेदवारीसाठी समोर येऊ लागली आहेत. अनेक ठिकाणी पक्षकार्यालयांनी कात टाकली असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षकार्यालयांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. तसंच आजूबाजूच्या मतदारसंघात येणं-जाणं सोपं व्हावं याकरता अनेक नेत्यांनी मध्यवर्ती कार्यालयांचीही उद्घाटने केली आहेत. दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या सुषमा अंधारे यांनाही यंदा तिकिट मिळण्याची शक्यता आहे. यावर त्यांनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे.

सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांना निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. “पुण्यात कार्यालय सुरू झालं. तुम्हीही निवडणुकीच्या रिंगणात आहात, कशी तयारी सुरू आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “पुण्यात मी निवडणूक लढवणार नाहीय. माझी स्वतःची अशी अपेक्षा आहे की २८८ मतदारसंघात शिवसेना आणि इतर घटक पक्षाच्या सभा ताकदीने करणार आहे. पदाची, तिकिटाची अपेक्षा न करता मी पक्षासाठी काय चांगलं देता येईल याचा विचार करणार आहे.”

हेही वाचा >> Sushma Andhare : सुषमा अंधारेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर; पुण्यातील जागांबाबत मोठं वक्तव्य

“पुण्यात विश्रांतवाडीत कार्यालय आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचं मुख्यालय माझ्या घरापासून ३० ते ३५ किमी लांब आहे. तसंच, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना बसण्याची जागा करायची होती. त्यामुळे वडगावशेरीमध्ये दोन कार्यालय उभी केली आहेत. विधानसभेच्या अनुषंगाने हायवेला ऑफिस असावं म्हणून पुणे नगर रोडला ऑफिस तयार केलं आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हडपसरची जागा शिवसेनेला

महाविकास आघाडीत हडपसरची जागा शिवसेना (ठाकरे) लढणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या जागावाटपाआधीच सुषमा अंधारे यांनी उमेदवार जाहीर केला. शिवसेनेचे (ठाकरे) स्थानिक नेते महादेव बाबर येथून निवडणूक लढवतील असं अंधारे यांनी जाहीर केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) चेतन तुपे हे या येथील विद्यमान आमदार आहेत.