वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ४० वर्षीय तलाठ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण बोराटे (वय ४१,रा.सातारा गाव) असे आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचे नाव असल्याची माहिती सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली. लक्ष्मण बोराटे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील आरोपांची चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, लक्ष्मण बोराटे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यता घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यावर नातेवाईकांनी सायंकाळी उशिरा बोराटे यांचा मृतदेह ताब्यात घेवून अंत्यविधी केला.

औरंगाबादमध्ये महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत असलेले लक्ष्मण बोराठे यांनी शनिवारी रात्री उशिरा छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला होता. रविवारी सकाळी बोराटे लवकर न उठल्यामुळे त्यांच्या आईने बोराटे यांच्या आतेभावाला त्यांना उठविण्यासाठी पाठविले होते. त्यावेळी बोराटे यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर बोराटे यांच्या आईने व नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून बोराटे यांच्या घराचा दरवाजा तोडला असता, बोराटे गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना फासावरून खाली उतरवून शासकीय रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.