साहित्य संमेलन निमंत्रण पत्रिका आणि मुख्य व्यासपीठाच्या नावावरून निर्माण झालेल्या वादाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे याच जबाबदार आहेत, असे महामंडळाच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
महामंडळाच्या घटनेनुसार (कलम १२ अ आणि आ) आमंत्रण व कार्यक्रम पत्रिका छापण्यापूर्वी महामंडळाच्या अध्यक्षांची लेखी अनुमती घ्यावी, अशी स्पष्ट सूचना आहे, तसेच मार्गदर्शन व कार्यक्रम अंमलबजावणी समितीची भूमिकाही महत्त्वाची आहे. आता वाद अंगाशी आल्यानंतर महामंडळ, पर्यायाने तांबे आपली जबाबदारी झटकत असल्याचा दावाही सूत्रांनी केला.