राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी राळेगणसिद्घी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली.
एका विवाहानिमित्त तटकरे आज नगरला आले होते. त्यानंतर येथे पक्षाचा मेळावाही झाला. नगरहून मुंबईला परतताना तटकरे यांनी पारनेरजवळ वाट वाकडी करीत राळेगणसिध्दीला जाऊन हजारे यांची भेट घेतली. येथील संत यादवबाबा मंदिरात ही भेट झाली. सुमारे पंधरा मिनिटांच्या भेटीत हजारे व तटकरे यांच्यामध्ये दुष्काळी स्थितीसंदर्भात चर्चा झाल्याचे श्याम पठाडे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tatkare met anna hazare
First published on: 05-07-2014 at 03:41 IST